दीड लाख बस इलेक्ट्रिकवर चालविणार

By admin | Published: December 13, 2015 10:38 PM2015-12-13T22:38:35+5:302015-12-13T22:38:35+5:30

प्रदूषणावरील वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विजेवर चालणाऱ्या दोन बस खासदारांसाठी भेट देणार आहेत.

One and a half million buses will run on electric | दीड लाख बस इलेक्ट्रिकवर चालविणार

दीड लाख बस इलेक्ट्रिकवर चालविणार

Next

नवी दिल्ली : प्रदूषणावरील वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विजेवर चालणाऱ्या दोन बस खासदारांसाठी भेट देणार आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्याच्या कार्यात आपली भूमिका बजाविण्यात खासदारांना मदत मिळेल.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना दोन इलेक्ट्रॉनिक बस प्रदान करतील, असे गडकरी म्हणाले.’ ज्या बॅटरीचा उपयोग भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) उपग्रहांमध्ये करीत आहे, त्याच बॅटरीवर या लिथियम-आयनचलित बसगाड्या चालतील. या बसगाड्यांचा वापर खासदारांना संसदेपर्यंत घेऊन जाणे आणि तेथून परत आणण्यासाठी केला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. मंत्रालय आणि अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या बॅटरी विकसित केल्या आहेत.
> ते म्हणाले की, पथदर्शी प्रकल्पांतर्गत प्रारंभी दिल्लीत अशा १५ बस चालविण्याची आमची योजना आहे. त्यानंतर अन्य शहरांमध्येही अशा बस चालविण्यात येतील. वायुप्रदूषण हा एक मुद्दा आहे, ज्यामुळे सरकार चिंतित आहे आणि मंत्रालय दिल्लीशी संबंधित अशा सर्व मुद्यांवर दोन वर्षांच्या आत तोडगा काढण्यास कटिबद्ध आहे.
संपूर्ण देशभरातील वायुप्रदूषण कमी करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. देशात डिझेलवर चालणाऱ्या सुमारे दीड लाख बस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे. नागपुरात बायो-सीएनजी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. ज्यावर बस चालू शकतील अशा बायो-सीएनजीच्या निर्मितीसाठी सांडपाण्यापासून मिथेन वायू घेण्याची सूचना गडकरी यांनी केली.

Web Title: One and a half million buses will run on electric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.