हृदयद्रावक! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:52 PM2021-12-01T20:52:09+5:302021-12-01T20:54:21+5:30
धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोणत्याही सदस्याला समजलं देखील नाही.
नवी दिल्ली - राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. लेकीकडे दुर्लक्ष करणं पालकांना चांगलंच महागात पडलं आहे. मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीड वर्षांची मुलगी खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोणत्याही सदस्याला समजलं देखील नाही. जोपर्यंत कुटुंबीयांना मुलीबद्दल समजलं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मंगळवारी सायंकाळी भरपूरमधील एका गावामध्ये सायंकाळी ही दु:खद घटना घडली. जेव्हा दीड वर्षांची विक्रांशी आपली मोठी बहीण हिमांशीसोबत खेळता खेळता घराच्या अंगणात आली. याच ठिकाणी एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. चिमुरडी खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडली. मुलीच्या मृत्यूचं समजल्यानंतर घरात आरडाओरड सुरू झाला. चिमुकलीला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
फक्त 3 वर्षांची हिमांशी अंगणात एकटीच खेळताना दिसली...
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्य शेतात काम करीत होते. तेव्हा महिला घरातील कामात व्यस्त होत्या. काही वेळानंतर जेव्हा घरातील महिलांचं मुलीकडे लक्ष गेलं तर त्यांना फक्त 3 वर्षांची हिमांशी अंगणात एकटीच खेळताना दिसली. मात्र छोटी विक्रांशी दिसत नव्हती. जेव्हा महिलांनी विक्रांशीला इकडे तिकडे पाहिलं तर ती पाण्यात टाकीत पडली होती. तिला पाहून महिला घाबरल्या. त्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.