पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 05:36 PM2019-02-16T17:36:32+5:302019-02-16T18:06:16+5:30
जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे.
श्रीनगर- पुलवाम्यातील शहिदांना अंतिम निरोप देण्यापूर्वीच आणखी एक जवान शहीद झाला आहे. जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे. LOCवर तपासणीदरम्यान हा आयईडीचा स्फोट झाल्यानं तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या स्फोटात एक जवान शहीद झाला असून, एक जवान जखमी आहे. तो लष्कराचा अधिकारी आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असतानाच आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात एका जवानाला वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतील 1.5 किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी हा आयईडीचा बॉम्ब पेरून ठेवला होता. त्यानंतर लष्करातील एका अभियंत्या जवानानं तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यादरम्यानच बॉम्बचा स्फोट झाला आणि तो जवान शहीद झाला. लष्कराचे अधिकारी याचा अधिक तपास करत आहेत. संपूर्ण परिसराला लष्करानं घेरलं असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे.
The Major-rank army officer was killed while defusing an Improvised Explosive Device (IED) which had been planted by terrorists. The officer is from the Corps of Engineers. The IED was planted 1.5 kms inside the Line of Control in the Naushera sector, Rajouri district, in J&K https://t.co/ZyWFS9RbWR
— ANI (@ANI) February 16, 2019
Jammu & Kashmir: One Army officer has lost his life in an explosion in the Rajouri sector along the Line of Control. Nature of explosion being ascertained; More details awaited pic.twitter.com/UKQtY7F38S
— ANI (@ANI) February 16, 2019