काश्मीर खोऱ्यात चायनीज हँड ग्रॅनेडसह एकास अटक, चौकशी सुरू
By महेश गलांडे | Published: December 25, 2020 03:29 PM2020-12-25T15:29:50+5:302020-12-25T15:38:26+5:30
पोलिसांनी अमीरला ताब्यात घेतलं असून कुठल्या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. अवंतीपोर येथेच गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा जवांनांच्या मोहिमेला आज आणखी एक यश आलं आहे. काश्मीरच्या अवंतीपोरा परिसरात शोध मोहिमेदरम्यान, एकास अटक करण्यात आली आहे. अमीर आश्रफ खान असं अटकेतील तरुणाचं नाव असून त्याच्याकडून चायनीज हँड ग्रॅनेड जप्त करण्यात आलंय. घराच्या कंपाऊंडमध्ये एका प्लॅस्टीक बाटलीत या युवकाने हे हँड ग्रॅनेड लपवले होते. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी अमीरला ताब्यात घेतलं असून कुठल्या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. अवंतीपोर येथेच गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अल-बदल संघटनेच्या 4 दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणा स्फोटक आणि शस्त्रास्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. एके 46 रायफल, एके 56 मॅगजीन, 28 राऊंड गोळ्या, स्फोटक आणि हँड ग्रॅनेड जप्त करण्यात आलंय. यावेळी, दहशतवादी आणि सुरक्षा दलांतील जवानांमध्ये चकमकही झाली होती. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातही सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली होती.
Awantipora police today arrested one person identified as Amir Ashraf khan and recovered a Chinese hand grenade from his possession which he had kept concealed in a plastic jar in the compound of his house: Jammu and Kashmir Police pic.twitter.com/muED5ZCRuE
— ANI (@ANI) December 25, 2020