फसवणूक प्रकरणातील एकाचा अटकपूर्व फेटाळला
By admin | Published: June 14, 2016 12:22 AM2016-06-14T00:22:01+5:302016-06-14T00:22:01+5:30
जळगाव : उत्पन्न वाढवून मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी अभिजित भाऊराव सारस्वत याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.
Next
ज गाव : उत्पन्न वाढवून मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी अभिजित भाऊराव सारस्वत याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.नोएडा येथील सफायर गु्रप ऑफ इंडिया कंपनीकडून राबवण्यात येणार्या योजनेच्या माध्यमातून उत्पन्न वाढवून मिळेल, असे आमिष अभिजित सारस्वत याने फिर्यादी सारिका विजय दाणेज यांना दाखवले होते. त्यानुसार दाणेज यांनी या कंपनीत २ लाख ४९ हजार रुपये धनादेश व रोख स्वरुपात भरले होते. मात्र, विहीत कालावधीत उत्पन्न वाढले नाही तसेच भरलेल्या रकमेचा परतावादेखील मिळाला नाही. म्हणून दाणेज यांनी कंपनीचे चेअरमन व अभिजित सारस्वत विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २७ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून अभिजितने न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके यांनी तर संशयितातर्फे ॲड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.