एक देश, एक निवडणूक! पंतप्रधान मोदींचे आग्रही प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 07:29 AM2020-11-27T07:29:12+5:302020-11-27T07:29:38+5:30

पंतप्रधान मोदींचे आग्रही प्रतिपादन; एकाच मतदार यादीचीही गरज

One country, one election! Prime Minister Modi's insistent statement | एक देश, एक निवडणूक! पंतप्रधान मोदींचे आग्रही प्रतिपादन

एक देश, एक निवडणूक! पंतप्रधान मोदींचे आग्रही प्रतिपादन

googlenewsNext

केवडिया (गुजरात) : देशात सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच घेतल्या जाव्यात, या आग्रही मताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी ‘एक देश, एक निवडणूक’, ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी, असेही मत मोदी यांनी व्यक्त केले.

पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८८व्या अखिल भारतीय परिषदेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, ‘निवडणुका ही खर्चीक बाब आहे. तसेच सतत निवडणुका होत राहिल्यास विकासकामेही रखडतात.

समन्वयाची गरज 
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी  विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका या तीन संस्थांमध्ये उत्तम समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राज्यघटनेत या तीनही यंत्रणांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही ते म्हणाले. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मोदी यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. 

पंतप्रधान उद्या पुण्यात, लसीचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येत आहेत. ‘सीरम’मध्ये सुमारे तासभर थांबून कोरोनावरील लस उत्पादनाची माहिती घेणार  आहेत. त्यानंतर ते हैदराबादला जाणार आहेत.  

खर्च कमी होईल, विकासकामेही होतील
n आपल्या देशात अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच असतात. 
n लोकसभा निवडणुकीबरोबरच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या तर या खर्चात बचत होऊन विकासकामांना गती येईल. तसेच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदारयादी असावी. 
n सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी सातत्याने मतदारयाद्या अद्ययावत कराव्या लागतात. त्यामुळे पैशांचाही अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी एकच मतदारयादी गरजेची आहे.’

‘एक देश, एक निवडणूक’ हा केवळ चर्चेचा विषय नसून ती देशाची गरज आहे. देशात अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात. त्याचा विकासकामांवर परिणाम होतो.      
    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: One country, one election! Prime Minister Modi's insistent statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.