दिल्ली विमानतळावर एक कोटीचे परकीय चलन जप्त
By admin | Published: January 5, 2017 09:07 PM2017-01-05T21:07:01+5:302017-01-05T21:16:55+5:30
महसूल गुप्तचर संचानालयाने (डीआरआय) दिल्ली विमानतळावर केलेल्या कारवाईत एक कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 05 - महसूल गुप्तचर संचानालयाने (डीआरआय) दिल्ली विमानतळावर केलेल्या कारवाईत एक कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे.
दिल्ली विमानतळावर डीआरआयच्या अधिका-यांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी टर्मिनल 3 वर एका भारतीयासह विदेशी नागरिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे परकीय चलन सापडले. दरम्यान, या दोघांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडील चलन अधिका-यांनी जप्त केले आहे. भारतीय नागरिकांने दुबईला जाण्यासाठी भुवनेश्वमध्ये एअर इंडिया विमानाचे तिकीट बुक केले होते.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या परकीय चलनाची किंमत 1 कोटी 88 हजार 237 रुपये इतकी आहे.