शिपायाने पक्षाच्या खात्यात जमा केला एक कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 09:25 AM2017-07-22T09:25:40+5:302017-07-22T09:25:40+5:30

राजकीय पक्षांना मिळणा-या निधीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून यावेळी बिजू जनता दल चौकशीच्या घे-यात अडकण्याची शक्यता आहे

One crore fund deposited in the party's account | शिपायाने पक्षाच्या खात्यात जमा केला एक कोटींचा निधी

शिपायाने पक्षाच्या खात्यात जमा केला एक कोटींचा निधी

Next
>ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 22 - राजकीय पक्षांना मिळणा-या निधीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून यावेळी बिजू जनता दल चौकशीच्या घे-यात अडकण्याची शक्यता आहे. पक्षाला करोडो रुपयांचा निधी मिळाला असून हा सर्व निधी बेनामी असल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे पक्षाच्या खात्यात करोडो रुपये जमा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक शिपाई आहे. बिजू जनता दलाने मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन आणि खोटे असल्याचा दावा केला आहे. 
 
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, रिपोर्टमध्ये बँकेतील कागदपत्रांचा दाखला देण्यात आला आहे. त्यानुसार बिजू जनता दलाच्या मुख्यालयात काम करणा-या पूर्ण चंद्र पाढी नावाच्या शिपायाने पक्षाच्या खात्यात एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. शिपायाने मात्र आपण पक्ष निधीसाठी गोळा केलेले पैसे पक्षाच्या खात्यात जमा केल्याचा दावा केला आहे. 
 
इतर बातम्या
अविनाश भोसले यांच्यासह मुलीच्या घरावर प्राप्तिकरचे छापे
कुलगुरूंनी तातडीने राजीनामा द्यावा, युवासेनेची मागणी
‘ट्रेनमध्ये सीट देण्यासाठी लाच मागणे म्हणजे खंडणी नाही’
 
ओडिसामधील या सत्ताधारी पक्षाने 2009 नंतर पक्षाच्या खर्चाचा तपशील देणारा वार्षिक अहवाल सादर केलेलाच नाहीत. कायद्यानुसार राजकीय पक्षाने खर्चाच तपशील देणं गरजेचं असतानाही तो देण्यात आलेला नाही. यावर पक्षाचे प्रवक्ता प्रताप देब यांनी सर्व आरोप फेटाळत सांगितलं आहे की, "या मुद्द्यावर गतवर्षीदेखील ओडिसा विधानसभेत चर्चा झाली होती. भाजपा आणि काँग्रेस आमदारांनी या चर्चेत भाग घेतला होता. कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार करण्यात आलेला नाही". 
 
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणुनबुजून आरोप केले जात असल्याचा दावा प्रताप देब यांनी केला आहे. प्रताप देब यांनी सांगितलं की, "सर्व कागदपत्रं सार्वजनिक आहेत. आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. हे आमच्याविरोधातील षडयंत्र आहे".
 
गतवर्षी 2016 मध्ये विरोधी नेता निरसिंघा मिश्रा यांनी शिपायाकडून करोडो रुपयांचा निधी मिळवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, "गंजम जिल्ह्यात राहणा-या या शिपायाने बिजू जनता दलाच्या एसबीआय खात्यात एका दिवसात आठ कोटी रुपये जमा केले आहेत". मिश्रा यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत उत्तर मागितलं होतं.  
 
त्यावेळी आरोपांना उत्तर देताना कायदा मंत्री अरुण साहू यांनी ज्या खात्यात आठ कोटी रुपये जमा झाले आहेत ते पक्षाचं असल्याचं विधानसभेत मान्य केलं होतं. मात्र त्यांनी पैसे कुठून आलेत यावर काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण व्यवहारात कोणतीही गडबड नसल्याचा दावा त्यांनी केला होता.

Web Title: One crore fund deposited in the party's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.