बेघरांसाठी एक कोटी घरे, 1 कोटी कुटुंबांना गरिबीमुक्त करणार
By admin | Published: February 1, 2017 12:17 PM2017-02-01T12:17:38+5:302017-02-01T12:21:42+5:30
2017-18च्या अर्थसंकल्पात जेटलींनी गरीबांकडे विशेष लक्ष दिले आहे. बेघर आणि कच्च्या घरात
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि 1 - 2017-18च्या अर्थसंकल्पात जेटलींनी गरीबांकडे विशेष लक्ष दिले आहे. बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्यांसाठी 2019 पर्यंत एक कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आहे. तसेच त्यासाठीची तरतूद 15 हजार कोटींवरुन तरतूद 23 हजार कोटींपर्यंत वाढवली आहे. त्याबरोबरच 1 कोटी कुटुंबाना गरिबीमुक्त करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
गरीब वर्गासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा
- बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्यांसाठी 1 कोटी घरे बांधणार
- 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य
- 2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार
- 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली
- 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद