झोपडीत राहणाऱ्या मजुराला कसं मिळालं १ कोटींचं कर्ज, ८ ट्रॅक्टर घेतले; मृत्यूनंतर झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:57 PM2022-09-29T13:57:36+5:302022-09-29T13:58:11+5:30

सर्वसामान्य माणसाला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात पण श्रीमंतांना एका झटक्यात कर्ज मिळून जातं हे तर तुम्ही ऐकलं असेलच. पण आग्र्यात एक वेगळीच घटना घडली आहे.

one crore loan name of laborer 8 tractor 5 thresher finance bank of india secret revealed after death | झोपडीत राहणाऱ्या मजुराला कसं मिळालं १ कोटींचं कर्ज, ८ ट्रॅक्टर घेतले; मृत्यूनंतर झाला खुलासा!

झोपडीत राहणाऱ्या मजुराला कसं मिळालं १ कोटींचं कर्ज, ८ ट्रॅक्टर घेतले; मृत्यूनंतर झाला खुलासा!

Next

सर्वसामान्य माणसाला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात पण श्रीमंतांना एका झटक्यात कर्ज मिळून जातं हे तर तुम्ही ऐकलं असेलच. पण आग्र्यात एक वेगळीच घटना घडली आहे. एका मजुराच्या नावावर तब्बल १ कोटीहून अधिकचं कर्ज घेतल्याच प्रकरण उघडकीस आलं आहे. मजुराच्या नावावर बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेऊन घेऊन ८ ट्रॅक्टरसह अनेक प्रकारच्या कृषी यंत्र खरेदी करण्यात आली. संबंधित मजुराचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना कर्ज फेडीचं पत्र मिळाल्यानंतर सर्व गदारोळ उघडकीस आला. 

बँकेचं पत्र मिळताच मजुराच्या कुटुंबीयांची झोपच उडाली. याप्रकरणी कारवाईसाठी वडिलांनी सोयेत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर एजन्सीचालकाविरुद्ध फसवणुकीची तक्रारही केली आहे. मात्र ५ महिन्यांहून अधिक काळ चकरा मारूनही त्याची कोणतीही सुनावणी झालेली नाही.

ट्रॅक्टरच्या शोरुममध्ये करायचा काम
जिल्ह्यातील सोयत पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीपतपुरा गावात हे विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ट्रॅक्टर एजन्सीच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या पवन या मजुराच्या नावावर बँकेकडून ८ ट्रॅक्टर, ५ थ्रेशर आणि सुमारे २ डझन इतर कृषी यंत्रांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे. हा तरुण सुमारे ७ वर्षांपासून या शोरूममध्ये काम करत होता. आता या मजूर तरुणाच्या वडिलांनी सोयत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर शोरूमच्या चालकांवर फसवणूक केल्याचा आरोप करत फिर्याद दिली आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडून कारवाई होत नसल्याची तक्रारही त्यांनी एसपी आणि एसडीओपीकडे केली आहे.

बँक ऑफ इंडियाने कर्ज दिले
आता या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रथम एका मजुराला बँकेनं एवढं कर्ज कसं दिलं. एवढं मोठं कर्ज देणारी बँक (बँक ऑफ इंडिया) आगर जिल्ह्यापासून वेगळी असलेल्या राजगडमध्ये आहे. त्यांच्या अखत्यारीत नसताना कर्ज कसं दिलं गेलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती जमातीसाठी चालवण्यात येणाऱ्या सरकारी योजनेअंतर्गत तरुणांना हे कर्ज देण्यात आलं होतं. त्यामुळे हा सारा खेळ नियोजनबद्ध पद्धतीनं सबसिडी हडप करण्यासाठी केला गेला असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

मजुराच्या वडिलांना मनस्ताप
सध्या मयत मजुराच्या वडिलांचे म्हणणं आहे की, कर्जात घेतलेले ट्रॅक्टर व मशिन कुठे व कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती नाही. एकाच व्यक्तीच्या नावावर एकाच वेळी ८ ट्रॅक्टर कसे काय फायनान्स केले, हाही प्रश्न आहे. सध्या सोयत पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा आहे.

Web Title: one crore loan name of laborer 8 tractor 5 thresher finance bank of india secret revealed after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.