केंद्राकडून कृषी खात्यास 1 कोटीचा पुरस्कार फोटो माहिती खात्याकडून येणार

By admin | Published: January 30, 2016 12:17 AM2016-01-30T00:17:38+5:302016-01-30T00:17:38+5:30

केंद्राकडून कृषी खात्यास

One crore rupees from the Center for Agricultural Accounts will come from the Photo Information Department | केंद्राकडून कृषी खात्यास 1 कोटीचा पुरस्कार फोटो माहिती खात्याकडून येणार

केंद्राकडून कृषी खात्यास 1 कोटीचा पुरस्कार फोटो माहिती खात्याकडून येणार

Next
ंद्राकडून कृषी खात्यास
1 कोटीचा पुरस्कार

पणजी : राज्यातील कृषी क्षेत्रात ‘अन्नधान्य उत्पादनात वाढ’ झाल्याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे गोवा राज्य कृषी खात्याला 1 कोटी रुपयाचा ‘कृषी कर्मण्य’पुरकार प्रप्त झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा राज्यात कृषी उत्पादनात वाढ झाल्याने 2014-15 सालच्या पुरस्कारासाठी राज्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या तीन ते चार वर्षापासून कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. कृषी खाते आणि फलोत्पादन महामंडळ एकत्रिपणे राज्यातील शेतकर्‍यांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे. या योजना तळागाळील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी अधिकारीही शेतात, बागायतीत उतरत आहे. काजू, आंबे इत्यादीच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करण्यास कृषी अधिकारी डोंगराळ भागातही शेतकर्‍यांबरोबर मैलाचे अंतर तुडवतात. शेतकर्‍यांचे कष्ट आणि अधिकार्‍यांची सेवा यामुळे कृषी क्षेत्रात साकारात्मक प्रगती होउ लागली असल्याचे तवडकर म्हणाले.
राज्यात 2010-11 सालात अन्नधान्य उत्पादनाचे प्रमाण कमी होते. मात्र 2014-15 सालात त्यात चांगली वाढ झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्याला पुरस्कार जाहिर करतानाच कृषी खाते व खात्याला संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुरस्काराचे स्थळ आणि वेळ यापुढे कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले असल्याचे तवडकर म्हणाले.
गोवा बनू शकतो ‘ऑर्चिड हब’
गोव्यात ऑर्चिड फुले उत्पादनासाठी चांगले वातावरण आहे. आतापर्यंत साधारण 105 पॉलीहाउस बांधण्यात आली आहेत. ऑर्चिडच्या फुलांसाठी चांगली बाजारपेठे असून हा एक उत्कृष्ट व्यवहाय होउ शकतो. फुलोत्पादनाच्या व्यावसायिक शेतीकडे गोव्यातील तरुण वर्ग वळू लागला असून कृषी क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ही सकारात्मक बाब आहे. ऑर्चिड फुलांचे उत्पादन वाढल्यास गोवा ऑर्चिड हब बनू शकतो असे प्रतिपादन तवडकर यांनी केले.
कृषी महोत्सवांचे योगदान
कृषी खात्यातर्फे साधारण दोन वर्षापासून प्रत्येक तालुक्यात कृषी मेळाव्यांचे आयोजन घडवून आणण्यात आले. या मेळाव्यांमुळे शेतकर्‍यांमधे जागृती झाली. अधिकार्‍यांच्या संवाद साधणे, योजनांची माहिती, समस्यांचे निवारण, तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी माहिती मिळू लागली. अशा कृषी मेळाव्यांमुळे शेतकर्‍यांमध्ये शेतीत वैविध्यता आणून पाहण्याचा उत्साह आला. यामुळे सामुहिक शेती, सिझनल शेती, फुलोत्पादन, फळोत्पादन इत्यादी क्षेत्रात वाढ होउ लागली. राज्यात यापुढे कृषी क्षेत्र अधिक चांगली कामगिरी बजावले असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
..चौकट..
कृषी खात्याचे उपक्रम
खात्याने यंदाच्या वर्षात 2015-16 साठी उस उत्पादकांसाठी दर वाढविला आहे. सदर दर 2400 वरुन 2500 करण्यात आला आहे. राज्यात 7 हेक्टर जमिनीत ऑर्चिड आणि जरबेरा उत्पादन काढण्यात येते. पॉलीहाउससाठी 18 हेक्टर जमिनीचा वापर करण्यात आला आहे. राज्यातील शेतकर्‍यांकडून साधारण 20 लाख रुपयांची भाजी 385 टन फलोत्पादन महामंडळाने खरेदी केली आहे. मिरचीच्या हायब्रीड बियाणांचेही शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. गोव्यातील मिरची आता बेळगाव, महाराष्ट्राच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होउ लागली आहे. कृषी उत्कर्षासाठी असे अनेक उपक्रम खात्यातर्फे राबविण्यात येत असल्याची माहिती तवडकर यांनी दिली.

Web Title: One crore rupees from the Center for Agricultural Accounts will come from the Photo Information Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.