एक करोड दिलेच नव्हते : भद्रेची कबुली

By admin | Published: February 17, 2016 02:00 AM2016-02-17T02:00:19+5:302016-02-17T02:00:19+5:30

नागपूर : अजय राऊतला अपहरण केल्यानंतर आपण एक करोड काय एक दमडीही दिली नव्हती. त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच अपहरण आणि उधारीच्या रकमेचा कट रचण्यात आला होता,असे कुख्यात गुंड राजू भद्रे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

One crore was not given: Bhadrechi confession | एक करोड दिलेच नव्हते : भद्रेची कबुली

एक करोड दिलेच नव्हते : भद्रेची कबुली

Next
गपूर : अजय राऊतला अपहरण केल्यानंतर आपण एक करोड काय एक दमडीही दिली नव्हती. त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच अपहरण आणि उधारीच्या रकमेचा कट रचण्यात आला होता,असे कुख्यात गुंड राजू भद्रे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
भद्रे सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. गेल्या ३०-३२ तासांपासून पोलीस भद्र्रेची खबरबात घेत आहे. पहिल्या १२ तासाच्या झाडाझडतीतच कुख्यात भद्रेने पोलिसांसमोर अजय राऊत अपहरण आणि खंडणी प्रकरणाच्या सुरुवातीपासून तो समाप्तीपर्यंतच्या घटनाक्रमाचा उलगडा केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार, क्रिकेट सट्ट्याच्या खयवाडी-लगवाडीत राऊत जुळला आहे. तो थेट गोव्याला कटिंग (उतारी) करतो. कॅसिनोचाही तो लकी जुगारी आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोट्यवधींची माया असल्याचे भद्र्रे टोळीला माहीत होते. राऊतच्या लहान भावाचा गेल्या वर्षी गेम झाला. त्यामुळे राऊत दहशतीत आहे. जीवे मारण्याचा धाक दाखविल्यास तो मोठी खंडणी देऊ शकतो, याची खात्री असल्यामुळे भद्र्रे आणि त्याचा राईट हॅण्ड कुख्यात दिवाकर कोतुलवारने कट रचला. त्याप्रमाणे आपल्या टोळीतील गुंडांच्या मदतीने कोतुलवारने राऊतचे दिवसाढवळ्या अपहरण केले. त्याला तीन तास मारहाण करून भद्र्रेच्या घरामागे असलेल्या मठात नेेले आणि तेथे त्याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळली. यातील ७५ लाख हिराचंदानी आणि मुणोत या दोघांनी दिले तर एक करोड रुपये राजू भद्रेकडून उधार घेण्याचे दिवाकरने सुचविले होते. प्रचंड दहशतीत आलेल्या राऊतने भद्र्रेला फोन केला अन् ठरलेल्या कटानुसार भद्रेच्या भावाकडून पेपरची रद्दी भरलेली बॅग (एक करोड रुपये असल्याचे सांगून) दिवाकरने घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दागिने गहाण ठेवून राऊतने भद्र्रेकडे ५० लाख रुपये आणि त्यानंतर पुन्हा ५० लाख रुपये परत आणून दिले.
अशाप्रकारे आपण उधारीच्या नावाखाली एक दमडीही राऊतला दिली नव्हती. केवळ दिखावा केला होता, असे भद्रेने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात सांगितल्याची माहिती आहे. भद्र्रे २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा असल्याचे पोलीस सांगतात.
---

Web Title: One crore was not given: Bhadrechi confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.