शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 09:43 PM2018-10-14T21:43:47+5:302018-10-14T23:42:27+5:30
शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं ढिगा-याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश- शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यानं ढिगा-याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची टीम पोहोचली आहे. बचाव पथकानं पोलिसांच्या मदतीनं 15 लोकांना ढिगा-याखालून बाहेर काढलं आहे. परंतु या दरम्यान तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. आताही या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक मजूर दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारतीत जवळपास 60 मजूर काम करत होते. बचाव कार्याला गती प्राप्त झाली असून, लखनऊमधून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवान्या झाल्या आहेत. इमारतीच्या बाहेरील भिंती तोडून मजुरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Latest visuals from Shahjahanapur where an under-construction building collapsed earlier today. Police say,"Rescue ops underway and 2 people are under the debris. 2 people are dead among the 15 people who were sent to hospital." pic.twitter.com/ZIsrZYNkQY
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2018
#UPDATE Shahjahanapur under-construction building collapse: One body recovered from under the debris. 14 people rescued, 2 of them critically injured. They've been sent to Lucknow. 3 more people are suspected to be trapped. Teams of SDRF and NDRF have been dispatched from Lucknow pic.twitter.com/BAeycOzEyQ
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2018
#Visuals from Shahjahanapur: An under construction building has collapsed. 5 labourers have been rescued from under the debris, several other feared trapped. More details awaited. pic.twitter.com/7HP0aANkNf
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2018
An under construction building has collapsed in Shahjahanapur. 5 labourers have been rescued from under the debris, several other feared trapped. More details awaited.
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2018
घटनास्थळी शाहजहांपूरचे डीएम आणि एसपी पोहोचले आहेत. निर्माणाधीन इमारतीमध्ये मोठा हॉल होता. त्याला पिलरचा आधार नव्हता. तो ढासळल्यानंतरच पूर्ण इमारती कोसळली आहे. आम्ही इमारतीच्या ढिगा-याखाली दबले गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं एका अधिका-यानं सांगितलं आहे. इमारत कोसळल्यानंतर ठेकेदार फरार झाला आहे. तर आजूबाजूची माणसेही बचावकार्याला मदत करत आहेत. या ढिगा-याखाली अनेक मजूर दबले गेल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ही घटना आरसी मिशन इथल्या बाबा हॉटेलजवळ घडली आहे. इथे एका डिग्री कॉलेजसाठीच्या इमारतीची बांधणी सुरू होती.