ओडिशामध्ये नदीत बोट उलटली, दहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 08:56 AM2019-01-03T08:56:10+5:302019-01-03T10:08:41+5:30
ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यामधील महानदीत बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रपाडा - ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यामध्ये महानदीत बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दहा जण सहलीला गेले होते. सहलीवरून परताना महानदीत बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. बोटीतील सर्वजण जगतसिंहपुर जिल्ह्यातून आले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत होता. त्याच दरम्यान दहा जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे.
Kendrapara boat capsize: The death toll in the boat capsize incident in Mahanadi river near Nipania in Kendrapara has reached nine after eight more bodies were recovered late last night. #Odisha
— ANI (@ANI) January 3, 2019
#UPDATE: Odisha CM announces ex gratia of Rs 4 lakh each for kin of deceased & free treatment for the injured in Kendrapara boat capsize https://t.co/FlEuZIOqcS
— ANI (@ANI) January 2, 2019
One dead and nine missing after a boat capsized in a river in Kendrapara district of #Odisha
— ANI (@ANI) January 2, 2019