उच्चशिक्षिताची एकाची आत्महत्या
By admin | Published: January 22, 2015 12:40 AM2015-01-22T00:40:41+5:302015-01-22T00:40:41+5:30
पुणे : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत आढळून आला आहे. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या व्यक्तीने आयआयटी पवई येथून शिक्षण घेतले होते आणि पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) नोकरी करीत होते.
Next
प णे : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत आढळून आला आहे. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या व्यक्तीने आयआयटी पवई येथून शिक्षण घेतले होते आणि पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) नोकरी करीत होते.राजेंद्र कृष्णजी लागू (वय ५८, रा. पौड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लागू हे बेपत्ता झाले होते. त्यांच्या बेपत्ता होण्याचा रिपोर्ट पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल ट्रेस करून ते कोठे आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोबाईलचे शेवटचे लोकेशन दौंड दाखविण्यात आले होते. त्यानंतर तपासणी सुरू असताना आज दुपारी साडेतीन वाजता लागू यांचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत पडलेला आढळला. त्यांची गाडी सिंहगड किल्ल्याजवळील पार्किर्ंगच्या भागामध्ये लावण्यात आली होती.प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी तशी नोंद केली आहे.---