40 तरुणींचा एकच पती, नाव 'रुपचंद'! एरियात त्याचाच बोलबाला, जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:31 PM2023-04-26T14:31:07+5:302023-04-26T14:32:06+5:30
जनगणना अधिकारी माहिती घेण्यासाठी पोहोचले. यावेळी महिलांनी त्यांचा पती एकच असल्याचे सांगितले.
पाटणा: बिहारमध्ये सुरू असलेल्या जातीय जनगणनेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या अरवाल जिल्ह्यातील एका भागात माहिती गोळा करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना 40 महिलांनी त्यांच्या पतीचे एकच नाव सांगितले. चाळीस महिलांचा एकच पती असल्याचे ऐकून अधइकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील 40 महिलांनी आपल्या पतीचे नाव रुपचंद असल्याचे सांगितले आहे. ही बाब अधिकाऱ्यांना समजताच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 40 महिला रुपचंद यांना त्यांचा पती म्हणतात, तर काहींनी रुपचंदला त्यांचा मुलगा आणि वडीलही म्हटले आहे. यावेळी जनगणना अधिकारी रुपचंद यांना भेटू शकले नाहीत. ही माहिती समोर आल्यानंतर प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
बिहारमध्ये 15 एप्रिलपासून जातीय जनगणना सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सर्व जातींसाठी सांकेतिक क्रमांकही वितरित करण्यात आले आहेत. नितीश सरकारकडून होत असलेल्या जात जनगणनेदरम्यान अधिकारी लोकांना 17 वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी महिलांना त्यांच्या पतीचे नाव विचारले असता, या एकाच परिसरातील वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या महिलांनी त्यांच्या पतीचे नाव रुपचंद असल्याचे सांगितले. या महिला ज्या ठिकाणी राहतात, ती जागा रेड लाइट एरिया आहे. इथल्या स्त्रिया प्रदीर्घ काळापासून नाच-गाणी करून आपले जीवन जगत आहेत.
काही महिला सेक्स वर्कर म्हणून काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. या महिलांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की, त्यांनी आपल्या पतीचे नाव काय सांगावे. अशा परिस्थितीत त्यांनी पैसा हेच आपले सर्वस्व असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच त्यांनी पतीच्या नाव रुपचंद सांगितले. येथी काही महिलांनी रुपचंदला मुलगा आणि वडीलही म्हटले. विशेष म्हणजे, या महिला पैशालाच रुपचंद म्हणतात.