रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू आसोदा शिवारातील घटना : अपघात की आत्महत्या याबाबत संभ्रम
By admin | Published: March 30, 2016 10:21 PM2016-03-30T22:21:00+5:302016-03-30T22:21:00+5:30
जळगाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Next
ज गाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जळगाव-भुसावळ डाऊन रेल्वेलाइनवर आसोदा शिवारातील विद्युत पोल क्रमांक ४२२/२३ दरम्यान एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृतदेह बुधवारी दुपारी १२ वाजता आढळून आला. अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसखाली आल्याने या इसमाचा मृत्यू झाला. रेल्वेखाली आल्याने त्याचे शीर व धड वेगवेगळे झालेले होते. इसमाची ओळख अस्पष्ट आहे. त्याने अंगात काळ्या रंगाचा फुल बाांचा शर्ट व राखाडी रंगाची जिन्स पॅण्ट घातलेली होती. हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव रेल्वेस्थानकाचे उपस्थानक प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार भादंवि कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.