दिल्लीत चांदणी चौकजवळ स्फोट, एकाचा मृत्यू
By Admin | Published: October 25, 2016 04:31 PM2016-10-25T16:31:03+5:302016-10-25T16:32:59+5:30
नया बाजार येथील चांदणी चौकाजवळ झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाली आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - नया बाजार येथील चांदणी चौकाजवळ झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाली आहेत. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर पोलिसांसहीत डॉग स्क्वॉड, फायर ब्रिगेड, गुप्तचर विभागाचे पथकदेखील घटनास्थळी झाले होते. दरम्यान, हा स्फोट सिलिंडरचा नसून फटाक्यांमध्ये वापरण्यात येणा-य
च्या स्फोटाप्रमाणे दिसत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनास्थळावर फटाक्यांमध्ये वापरण्यात येणारे स्फोटक पदार्थ सापडल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्यापतरी पोलिसांनी हा हल्ला दहशतवादी होता की नाही, हे स्पष्ट केलेले नाही. पोलीस आणि फायर ब्रिगेडला या स्फोटाची माहिती सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी मिळाली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की ज्या इमारतीच्या खाली हा स्फोट झाला त्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
#WATCH the moment of explosion in Naya Bazar which led to one death, acc to police "it looks like a firecracker explosion in a jute bag" pic.twitter.com/EpuVmKYkMA
— ANI (@ANI_news) October 25, 2016
As per investigation as of now, it seems like it was a firecracker explosion: SBK Singh (Special CP, Law & Order, Northern Range) #NayaBazarpic.twitter.com/qusVo3Jz4P
— ANI (@ANI_news) October 25, 2016
#FLASH Home Ministry seeks report from Delhi Police on Naya Bazaar (Chandni Chowk) explosion.
— ANI (@ANI_news) October 25, 2016
घटनास्थळावरील काही वस्तू फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतली असून चौकशीनंतरच हा स्फोट नेमका कोणत्या प्रकारचा होता, हे स्पष्ट होईल. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा सुदैवाने बाजारात माणसांची वर्दळ नव्हती, यामुळे मोठा अनर्थ टळला. दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेता खबरदारी म्हणून परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे.
#SpotVisuals : 1 dead in an explosion in Naya Bazar; Anti terror wing and special cell at the spot; investigation underway pic.twitter.com/jxVoZ5TpR9
— ANI (@ANI_news) October 25, 2016