कोरोनाने केले १ लाख मुलांना अनाथ; लॅन्सेटच्या अभ्यास अहवालातील निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:56 AM2021-07-23T08:56:05+5:302021-07-23T08:59:04+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे प्राण घेतले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे प्राण घेतले. त्यात कोणाचा मुलगा गेला तर कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, कोणाची आई गेली. एकूणच कोरोनाच्या या जीवघेण्या महासाथीने प्रत्येकाला दु:खाच्या खाईत लोटले. देशभरात तब्बल १ लाख लहानग्यांना अनाथ केले या कोरोनाने.
काय सांगतो लॅन्सेटचा अहवाल?
यंदाच्या एप्रिल महिन्यात लहान मुलांच्या अनाथ होण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ पटींनी अधिक आहे.
कोरोनामुळे देशभरात यंदाच्या वर्षी १ लाख १९ हजार लहानग्यांचे पालनकर्ते (पालक किंवा आजी-आजोबा) दगावले.
पालनकर्ते दगावण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर
१ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ११,३४,००० पालकांचा मृत्यू झाला. १०,४२,०००
मुलांच्या आई किंवा वडील यापैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतात १,१६,००० मुलांचे आई किंवा वडील कोरोनाने हिरावून नेले.
भारतातील चित्र
२५,५०० मुलांची आई दगावली. ९०,७५१ मुलांचे वडील दगावले. १२ मुलांचे आई-वडील दोन्ही दगावले