देशात एक लाख कोटींची गुंतवणूक

By Admin | Published: January 12, 2015 03:52 AM2015-01-12T03:52:18+5:302015-01-12T09:42:06+5:30

स्थिर धोरण आणि लवचिक कर प्रणालीच्या माध्यमातून भारताला उद्योगधंद्यासाठी सर्वाधिक सुलभ देश बनविण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले

One lakh crores investment in the country | देशात एक लाख कोटींची गुंतवणूक

देशात एक लाख कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

गांधीनगर : स्थिर धोरण आणि लवचिक कर प्रणालीच्या माध्यमातून भारताला उद्योगधंद्यासाठी सर्वाधिक सुलभ देश बनविण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असतानाच अंबानी, अदानी, बिर्ला, सुजुकी आणि रियो टिंटोसारख्या दिग्गज कंपन्यांनी रविवारी देशात १़६ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि सुमारे ५० हजार हातांना काम देण्याची ग्वाही दिली़ उद्योगपती मुकेश अंबानी यांनी येत्या १२ ते १८ महिन्यांत देशात एक लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली़
निमित्त होते, गुजरातच्या गांधीनगर येथे आयोजित सातव्या व्हायबे्रंट गुजरात परिषदेचे़ उद्योगवाढ आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या व्हायब्रेंट गुजरात परिषदेला रविवारी येथे सुरुवात झाली़ नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले़ स्थिर कर प्रणाली तसेच विश्वासार्ह, पारदर्शक आणि निष्पक्ष धोरणांसह भारताला जागतिक उत्पादनाचे स्थान बनवू, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जगभरातील गुंतवणूकदारांना ‘मेक इन इंडिया’ मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले़ तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल तर आम्ही तुमच्यासाठी दोन पावले पुढे चालत येऊ, अशा शब्दांत त्यांनी गुंतवणूकदारांना आश्वस्त केले़ मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजसह अदानी समूहाने सन एडिसन सोबतच्या भागीदारीतून गुजरातेत सोलर पार्क उभारण्यासाठी करार केला़ यात सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे २० हजार रोजगार निर्माण होतील़ अदानी समूहाने आॅस्ट्रेलियाच्या वूडसाइड या वीज कंपनीसोबतही यावेळी करार केला़

ओबामा भारत दौऱ्यासाठी उत्सुक

बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणारे पहिले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत, यामुळे ते प्रचंड उत्साहित आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले़ प्रजासत्ताकदिन सोहळ्याचे मुख्य अतिथी बनणारे ओबामा पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत़ याशिवाय आपल्या कार्यकाळात दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेले ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत़

Web Title: One lakh crores investment in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.