Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:52 PM2021-04-28T17:52:27+5:302021-04-28T17:55:25+5:30
Coronavirus In India : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.
देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अनेक ठिकाणी औषध आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेकडे पाहता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पीएम केयर्स फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बुधवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांना यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.
PM has sanctioned the procurement of 1 lakh Portable Oxygen Concentrators from PM Cares Fund. He instructed that these Oxygen Concentrators should be procured at the earliest & provided in states with high case burden: PMO pic.twitter.com/FrNpQ3IlHk
— ANI (@ANI) April 28, 2021
In addition to earlier sanctioned 713 PSA plants under PM Cares Fund, 500 new Pressure Swing Adsorption (PSA) oxygen plants sanctioned under PM CARES Fund.
— ANI (@ANI) April 28, 2021
PSA plants will augment the supply of Liquid Medical Oxygen at hospitals in district headquarters and Tier 2 cities: PMO
या बैठकीत पीएम केयर्स फंड अंतर्गत यापूर्वीच मंजुरी दिलेल्या ७१३ PSA प्लान्टपैकी ५०० नव्या ऑक्सिजन प्लांट्सनाही मंजुरी देण्यात आली आहे. पीएम केयर्स फंडद्वारे ५०० नवे ऑक्सिजन प्लांट उभारले जातील आणि त्यात ऑक्सिजनचं उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्नही केले जातील. हे प्लांट जिल्हा मुख्यालय आणि टिअर २ शहरांच्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतील. हे प्लांट DRDO आणि CSIR द्वारे विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्थापन केले जातील.