रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:06 AM2017-09-19T06:06:11+5:302017-09-19T06:06:32+5:30

वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

One lakh workers recruited in the railway, after the accidents, came to ministry | रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

Next

सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्यात रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची उपकरणे व आवश्यक साधन सामग्री तर हवीच, त्याचबरोबर कर्मचा-यांची कमतरता दूर करावी लागेल, ही बाब लक्षात आली.
बैठकीत सुरक्षेबाबत जे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार ज्येष्ठ रेल्वे अभियंत्यांची १00 टक्के पदे भरली जाणार आहेत. येत्या ३ महिन्यांत सहायक स्टेशन मास्तर व गार्ड यांची भरती होईल. ‘ग्रुप सी’मधील ५0 टक्के रिक्त पदे रेल्वे भरती बोर्डाद्वारे व ‘ग्रुप डी’तील निम्मी पदे आरआरबी व निम्मी पदे रेल्वे भरती प्रकोष्ठामार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे ६५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरसीमार्फत तर ३५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरबीमार्फत केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षेबाबत विभागवाद आडवा येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिका-यांनी सेक्शन इंजिनीअर्स, ज्युनिअर इंजिनीअर्स, ट्रॅकमन, चौकीदार आदींशी नियमित संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. रेल्वे कार्यालये, वर्कशॉप्स, स्टाफ क्वार्टर्स, रनिंग रुम्स, रेस्ट हाउसेस, आरपीएफ बॅरॅक्स यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.’
>समाधानाची बाब
या निर्णयाचे आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सुरक्षा श्रेणीत दोन लाख पदे रिक्त आहेत. तथापि एक लाख पदे त्यात अशी आहेत की ज्यांच्याशिवाय रेल्वेचे दैनंदिन कामकाज चालूच शकत नाही. उशिरा का होईना रेल्वे व्यवस्थापनाला आमच्या मागण्यांची दखल घ्यावीशी वाटली आणि नव्या भरतीचे त्यांनी आदेश दिले ही समाधानाची बाब आहे. या भरतीनंतरही विविध झोनना सुरक्षा श्रेणीतील कर्मचा-यांची कमतरता भासल्यास, त्यांना रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत सुचवले आहे. वित्त व कार्मिक विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करून महिन्याभरात रेल्वे पेन्शनरांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधून काढावा, अशा सूचना देण्यात आल्या.

Web Title: One lakh workers recruited in the railway, after the accidents, came to ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.