शत्रूच्या मालमत्ता विकून मिळणार एक लाख कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 04:32 AM2020-01-24T04:32:54+5:302020-01-24T04:34:23+5:30
शत्रूच्या ९,४०० पेक्षा जास्त मालमत्तांची विल्हेवाट लावून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : शत्रूच्या ९,४०० पेक्षा जास्त मालमत्तांची विल्हेवाट लावून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाची या मालमत्ता निकाली काढण्याच्या कामावर देखरेख आहे.
अधिकृत आदेशानुसार दोन उच्चस्तरीय समित्या असून, एकीचे प्रमुख मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा आणि दुसऱ्या समितीचे प्रमुख केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला आहेत. या दोन्ही समित्या शत्रूच्या स्थावर मालमत्तांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन केल्या जातील. ही सगळी कार्यवाही शत्रूची मालमत्ता कायद्याखाली होत आहे. पाक आणि चीनचे नागरिकत्व घेतलेल्या लोकांनी भारतात सोडून दिलेली मालमत्ता ही शत्रूची मालमत्ता समजली गेली आहे.