‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 04:05 PM2023-09-24T16:05:40+5:302023-09-24T16:07:56+5:30

One Nation One Election: वन नेशन, वन इलेक्शन संदर्भातील पहिली बैठक झाली असून, यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, असे सांगितले जात आहे.

one nation one election first meet held know what decision took in meeting | ‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले?

‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले?

googlenewsNext

One Nation One Election: केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’च्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय पक्ष आणि विधि आयोबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, यासंदर्भात एका निवेदनात माहिती देण्यात आली आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंह, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप आणि माजी दक्षता आयुक्त संजय कोठारी या बैठकीला उपस्थित होते.

विधि आयोगाला आमंत्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाली. या विषयावर सूचना देण्यासाठी राजकीय पक्षांना आणि विधि आयोगाला आमंत्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, समितीने मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, राज्यांतील सत्ताधारी पक्ष, संसदेत प्रतिनिधित्व असलेले पक्ष, इतर मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सूचना अथवा आपले मत सांगण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, समिती एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर विधि आयोगाच्याही सूचना आणि मते समजून घेण्यासाठी आमंत्रित करेल, असे विधि मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. या बैठकीला ज्येष्ठ वकील हरीश साळवे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी बैठकीला उपस्थित नव्हते. चौधरी यांनी गृहमंत्री शाह यांना लिहिलेल्या पत्रात समितीचा भाग होण्यास नकार दिला होता, असे निवेदनात नमूद केले आहे. 


 

Web Title: one nation one election first meet held know what decision took in meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.