One Nation One Election: ऐन निकालादिवशी मुख्य निवडणूक आयुक्तांचं 'एक देश एक निवडणूक'बाबत महत्वाचं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:35 AM2022-03-10T08:35:23+5:302022-03-10T08:36:14+5:30
One Nation One Election: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
One Nation One Election: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात होत असतानाच सुशील चंद्रा यांच्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "एक देश एक निवडणूक हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याच गरज आहे", असं सुशील चंद्रा म्हणाले.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आण गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. यासाठीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'एक देश एक निवडणूक'बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
One Nation One Election is a good suggestion but this needs a change in the Constitution. The Election Commission is fully geared up and is capable of holding all the elections simultaneously. We are ready to hold elections only once in 5 years: CEC Sushil Chandra pic.twitter.com/reixPOoqIl
— ANI (@ANI) March 10, 2022
"वन नेशन-वन इलेक्शन हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याची गरज आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे यासाठी सज्ज आहे. सर्व निवडणूका एकाचवेळी घेण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्ही पाच वर्षात देशात एकदाच निवडणूक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करू शकतो", असं सुशील चंद्रा म्हणाले.