एक टक्के लोकसंख्या देतेय जगाला चटके!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:51 AM2023-11-24T05:51:11+5:302023-11-24T05:52:06+5:30
६६ टक्के गरिबांच्या नशिबी आजार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन नेमके गरीब करतात की श्रीमंत याचे उत्तर समोर आले आहे. जगातील पाच अब्ज गरीब लोक जितके कार्बन उत्सर्जन करतात तितके प्रदूषण जगातील केवळ एक टक्के श्रीमंत करत असल्याचे ऑक्सफॅम इंटरनॅशनलने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे जगाच्या नाशाला कारणीभूत असणारे श्रीमंत लोक, कॉर्पोरेशन आणि देशांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे. गरीबी असणाऱ्या ९९ टक्के लोकांना श्रीमंतांइतके कार्बन उत्सर्जन करण्यासाठी १,५०० वर्षे लागतील.
प्रदूषणाला नेमके कोण जबाबदार?
जगातील सर्वाधिक श्रीमंत हे ५० टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
मध्यमवर्गीय ४३ टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
गरीब हे केवळ आठ टक्के उत्सर्जन करण्यासाठी जबाबदार असतात.
७७ पट अधिक कार्बन उत्सर्जन श्रीमंत लोक करत असून, यामुळे झपाट्याने तापमानात वाढ होत आहे.
धोरणे तयार करा
प्रत्येकजण या संकटासाठी तितकाच जबाबदार नाही. प्रदूषण निर्माण करणाऱ्यांसाठी आणि न करणाऱ्यांसाठी धोरणे तयार करावीत, असे अहवालाचे सह-लेखक मॅक्स लॉसन यांनी म्हटले आहे.
श्रीमंत कसे जबाबदार?
nरोजची भव्यदिव्य जीवनशैली, नौका, खासगी विमानाने प्रवास
nआर्थिक स्वार्थासाठी प्रचंड प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक
nमाध्यमांवर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर आणि धोरणनिर्मितीवर त्यांचा अवाजवी प्रभाव