पंतप्रधान मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:33 AM2019-10-13T10:33:15+5:302019-10-13T10:38:14+5:30

राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली होती.

one person has been arrested in connection with the incident of purse snatching of pm modis niece | पंतप्रधान मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक 

पंतप्रधान मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देराजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली होती. पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नोनू असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडे असलेली दमयंती बेन मोदी यांची पर्स आणि मोबाईल जप्त केला आहे.

नवी दिल्ली - चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली होती. शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

नोनू असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडे असलेली दमयंती बेन मोदी यांची पर्स आणि मोबाईल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंती बेन मोदी शनिवारी सकाळी अमृतसरहून दिल्लीला आल्या होत्या. दमयंती सिव्हील लाइन्स परिसरात असलेल्या गुजराती समाज भवनमध्ये राहणार होत्या. जुन्या दिल्लीहून ऑटो पकडून त्या आपल्या कुटुंबासोबत गुजरात समाज भवनला पोहोचल्या. त्याचवेळी ऑटोतून उतरत असताना स्कूटीवरून दोन जण आले आणि त्यांनी दमयंती यांची पर्स हिसकावून नेली होती. त्यानंतर आता चोरट्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दमयंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्समध्ये जवळपास 56 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत होते. या घटनेनंतर दिल्लीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ तसेच शोभेच्या वस्तूही चोरांनी लंपास केल्या. सत्येंद्र यांनी रविवारी (22 सप्टेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आरोग्यमंत्री जैन यांनी चोरीच्या घटनेनंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं होतं. यामध्ये दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या त्यांच्या घराचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोमध्ये घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. दिल्लीतील चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असं ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं. 
 

Web Title: one person has been arrested in connection with the incident of purse snatching of pm modis niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.