वन रँक वन पेन्शन, पहिले वाढीव पेन्शन जमा

By admin | Published: March 15, 2016 03:09 AM2016-03-15T03:09:28+5:302016-03-15T03:09:28+5:30

सैन्यदलांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्याच्या निर्णयानुसार पहिले वाढीव पेन्शन २.२१ लाख निवृत्तांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आहे.

One rank one pension, first incremental pension deposit | वन रँक वन पेन्शन, पहिले वाढीव पेन्शन जमा

वन रँक वन पेन्शन, पहिले वाढीव पेन्शन जमा

Next

नवी दिल्ली : सैन्यदलांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्याच्या निर्णयानुसार पहिले वाढीव पेन्शन २.२१ लाख निवृत्तांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आहे. यात रीतसर सेवानिवृत्त झालेले व अपंगत्वामुळे वेळेआधीच निवृत्त करण्यात आलेले अशा दोन्ही प्रकारच्या माजी सैनिकांचा समावेश आहे. त्यांना चालू महिन्याच्या सुधारित पेन्शनखेरीज १ जुलै २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या काळाच्या थकबाकीचा पहिला हप्ताही देण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनाव्दारे ही माहिती देताना सांगितले की, सुधारित पेन्शन व थकबाकी १ मार्च रोजी बँक खात्यांमध्ये जमा झाली आहे. याखेरीज ज्या १.४६ दिवंगत माजी सैनिकांच्या वारसांना फॅमिली पेन्शन मिळते त्यांचे सुधारित पेन्शन व थकबाकी मार्च अखेरपर्यंत जारी केले जाईल.
संरक्षण मंत्रालयातील माजी सैनिक कल्याण विभागाने ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्याची अधिसूचना गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी जारी केली होती. त्यानुसार पुढील प्रक्रिया करून आता सुधारित पेन्शन सुरु करण्यात आले आहे.
स्टेट बँकेचा सिंहाचा वाटा
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मुंबईत दिलेल्या माहितीनुसार या बँकेने सोमवारच्या एका दिवसात ‘वन रँक वन पेन्शन’नुसार१,४६५ कोटी रुपयांची रक्कम पेन्शनरांच्या खात्यांमध्ये जमा केली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

योजनेचा वार्षिक वाढीव बोजा ७ हजार ४८८.७० कोटी रुपये
मंत्रालयानुसार या योजनेचा वार्षिक वाढीव बोजा ७,४८८.७० कोटी रुपयांचा असून थकबाकीसाठी १०,९२५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. वाढीव पेन्शनचा सर्वाधिक म्हणजे ६,४०५ कोटी रुपयांचा (८५.५ टक्के) हिस्सा अधिकारी नसलेल्या माजी सैनिकांच्या वाट्याला जाणार आहे.
हा निर्णय होण्याआधी संरक्षण विभागाचा पेन्शनवरील वार्षिक खर्च ६०,२३८ कोटी रुपयांचा होता. सुधारित पेन्शनसाठी यंदाच्या संरक्षण अर्थ संकल्पात ४,७२१ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आल्याचेही मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘वन रँक वन पेन्शन’नुसार माजी सैनिकांना हुद्दा व वर्गवारीनुसार कसे सुधारित पेन्शन मिळेल याचे १०१ सविस्तर तक्तेही माजी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत.

Web Title: One rank one pension, first incremental pension deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.