एक रुपयाची नवलाई, विवाह सोहळा शाही ६ जोडप्यांचा सामूहिक विवाह : महाराजे हेमेंद्रसिंह पवार यांची उपस्थिती
By admin | Published: April 24, 2016 07:01 PM2016-04-24T19:01:11+5:302016-04-24T19:01:11+5:30
जळगाव : मराठा उद्योजक विकास मंडळ व क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक रुपयात सामूहिक विवाह सोहळ्याची नवलाई रविवारी सागर पार्कवर होती. मध्यप्रदेशातील धार येथील श्रीमंत महाराजे हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या शाही विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश केला. यावेळी आयोजकांनी वधू-वरांकडून फक्त एक रुपया घेतला व थाटात विवाह सोहळा पार पडला.
Next
ज गाव : मराठा उद्योजक विकास मंडळ व क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक रुपयात सामूहिक विवाह सोहळ्याची नवलाई रविवारी सागर पार्कवर होती. मध्यप्रदेशातील धार येथील श्रीमंत महाराजे हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या शाही विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश केला. यावेळी आयोजकांनी वधू-वरांकडून फक्त एक रुपया घेतला व थाटात विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यास आमदार सुरेश भोळे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती इंगळे, भाजपाचे माजी महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, धुळ्याचे माजी महापौर मोहन नवले, रेड स्वास्तिकचे सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, उद्योजक कैलास मराठे, अशोक थोरात, प्रवीण नवले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी महाराजे हेमेंद्रसिंह पवार यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता दीपप्रज्वालनाने विवाहसोहळ्याचा शुभारंभ झाला.सुमारे १५ लाखांची बचत मंडळाचे विठ्ठलराव मराठे यांनी प्रास्ताविक केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जणांचा विवाह झाला. हेच विवाह सोहळे स्वतंत्र झाले असते तर प्रत्येकाला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला असता. त्यामुळे १५ ते १६ लाख रुपयांची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.पुढच्या वर्षी ६० विवाह सोहळे व्हावेआमदार सुरेश भोळे यांनी सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सहा वरून पुढील वर्षी ६० विवाह करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आयोजकांना त्यांनी केले.काही जणांना सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणे हे कमीपणाचे वाटत असते. मात्र सामूहिक विवाह सोहळे हे गोरगरिबांसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.विधीवत सोहळ्याने गृहस्थाश्रमात प्रवेशसत्कार समारंभानंतर ब्रााणांच्या मंत्रोच्चारात आणि विधीवत सहभागी झालेल्या सहा जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी सनईचा मंजूळ सूर कार्यक्रमाची शोभा वाढवित होता. महाराजा हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या सभोवताली विशिष्ट वेशातील कार्यकर्ते होते.यांचा झाला एक रुपयात सामूहिक विवाह सोहळाविवाह सोहळ्यात अनिल भालेकर व मोहिनी म्हस्के, शरद महाडिक व मिना जगताप, साहेबराव मराठे व सारीका मांडोळे, श्रीकांत तांबे व दिपाली जाधव, गणेश बजारे व मोनिका डुब्बे, नीलेश मराठे व ज्योती पाटील यांचा विवाह पार पडला. विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधू-वरांना संसारपयोगी वस्तू देण्यात आल्या.