आयुक्तांनी सोडला एकतर्फी पदभार मनपा: नवीन आयुक्त गुरुवारी हजर होण्याची शक्यता

By admin | Published: July 5, 2016 09:02 PM2016-07-05T21:02:26+5:302016-07-05T21:02:26+5:30

जळगाव: मालेगाव मनपातून जळगाव मनपात नियुक्ती होऊन जेमतेम १६ दिवस उलटत नाही तोच पुन्हा बदली झालेल्या मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी अखेर मंगळवारी एकतर्फी पदभार सोडला. बुधवारी ते नाशिकला रवाना होणार आहेत. नूतन आयुक्त जीवन सोनवणे हे गुरुवारी हजर होण्याची शक्यता आहे.

The one-sided charge left by the commissioners: The possibility of the new commissioner to appear on Thursday | आयुक्तांनी सोडला एकतर्फी पदभार मनपा: नवीन आयुक्त गुरुवारी हजर होण्याची शक्यता

आयुक्तांनी सोडला एकतर्फी पदभार मनपा: नवीन आयुक्त गुरुवारी हजर होण्याची शक्यता

Next
गाव: मालेगाव मनपातून जळगाव मनपात नियुक्ती होऊन जेमतेम १६ दिवस उलटत नाही तोच पुन्हा बदली झालेल्या मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी अखेर मंगळवारी एकतर्फी पदभार सोडला. बुधवारी ते नाशिकला रवाना होणार आहेत. नूतन आयुक्त जीवन सोनवणे हे गुरुवारी हजर होण्याची शक्यता आहे.
मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मालेगाव मनपात आयुक्तपदावर काम केलेले किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी बोर्डे यांची मालेगाव मनपातून बदली झालेली होती. मात्र त्यांना पोस्टींग मिळालेली नसल्याने ते घरीच होते. त्यामुळे बदलीचे आदेश मिळताच तातडीने हजर होण्याचे शासनाकडून बजावण्यात आले. वास्तविक त्याचवेळी बोर्डे हे नाशिकसाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी शासनाने आदेशानुसार जळगाव आयुक्तपदी हजर होण्यास सांगितले. बोर्डे यांनी जळगाव मनपात पदभार घेतल्यानंतर मनपाच्या कारभाराची, अडचणींची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. अतिक्रमण हटाव व कर वसुली हे दोनच विषय प्रामुख्याने त्यांच्या अजेंड्यावर होते. मात्र शहराच्या हिताचे दोन विषय अजेंड्यावर असलेल्या आयुक्ताऐवजी जीवन सोनवणे यांच्यासारख्या केवळ १ वर्षांचाच सेवाकालावधी शिल्लक असलेल्या अधिकार्‍याची वर्णी लागावी यासाठी राजकीय वर्तुळातून प्रयत्न झाले. नाशिक येथील आमदार बाळासाहेब सानप, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून बोर्डे यांनी नाशिकला तर नाशिक येथील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची त्यांच्या जागी जळगावला आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे.
वास्तविक सोनवणे हेदेखील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नसल्याने बदलीस पात्र नव्हते. नाशिक येथे बदली झाल्याने सोय झाली असल्याने बोर्डे यांनी अवघ्या १६ दिवसांतच पुन्हा बदलीचे आदेश येऊनही मॅटमध्ये दाद मागणे टाळले आहे. आता सोनवणे कधी हजर होतात? याकडे लक्ष लागले आहे. बुधवारी मनपाला ईदची सु˜ी असल्याने सोनवणे हे गुरुवारी ७ रोजी हजर होण्याची शक्यता आहे.

Web Title: The one-sided charge left by the commissioners: The possibility of the new commissioner to appear on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.