नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार एका जवानाला वीरमरण, एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 09:02 PM2019-12-25T21:02:15+5:302019-12-25T21:05:19+5:30
पाकिस्तानी सैन्याने आज सकाळी हाजीपीर आणि उरी विभागात जोरदार गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य करून गोळीबार केला.
श्रीनगर - पाकिस्तानने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर एका स्थानिक महिलेचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
पाकिस्तानी सैन्याने आज सकाळी हाजीपीर आणि उरी विभागात जोरदार गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य करून गोळीबार केला. दरम्यान, उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले.
Army sources: One soldier has lost his life in ceasefire violation by Pakistan Army along Line of Control (LoC) in Uri sector. #JammuAndKashmirhttps://t.co/q7XcdW2TKj
— ANI (@ANI) December 25, 2019
पाकिस्तानी लष्कराने उरी विभागातील चुरुंदा गावाच्या दिशेने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. नसीमा बेगम असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागात पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्रभर गोळीबार केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
Army sources: One civilian, Naseema Begum, 22, killed in Pakistan Army firing in Churunda village of Uri sector. #JammuAndKashmirhttps://t.co/wJdcXolMIM
— ANI (@ANI) December 25, 2019
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने रहिवासी भागांना लक्ष्य करून गन आणि मोर्टारचा मारा केला, अशी माहिती लष्करामधील सुत्रांनी दिली. तसेच शाहपूर आणि किरनी विभागातही पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला.
Army sources: Pakistan is targeting Indian civilian population with gun & mortar positions which are deployed & colocated inside villages in Pakistan-occupied Kashmir.
— ANI (@ANI) December 25, 2019