दंतेवाडा-बिजापूर सीमेवर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, गोळीबारात २ नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:07 IST2025-03-20T13:05:31+5:302025-03-20T13:07:05+5:30

छत्तीसगडमधील बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात लक्षवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

One soldier martyred in an encounter on Dantewada-Bijapur border, 2 Naxalites killed in firing | दंतेवाडा-बिजापूर सीमेवर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, गोळीबारात २ नक्षलवादी ठार

दंतेवाडा-बिजापूर सीमेवर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, गोळीबारात २ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक गंगलूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर असताना ही चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू झाला.

धोका झाला...! देशासाठी हवाई संरक्षण पुरविणाऱ्या भेलची गोपनिय कागदपत्रे पाकिस्तानला लीक केली; एकाला अटक  

चकमक अजूनही सुरू आहे आणि परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर विजापूर जिल्हा राखीव रक्षकच्या एका जवानाला आपला जीव गमवावा लागला. २ नक्षलवाद्यांसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

यापूर्वी, विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ३१ नक्षलवादी मारले गेले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. चकमकीच्या ठिकाणाहून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत कारवाई करत आहेत. विजापूरच्या फरसेगड पोलीस स्टेशन नॅशनल पार्क परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सकाळपासून ही चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन सैनिकही जखमी झाले.

Web Title: One soldier martyred in an encounter on Dantewada-Bijapur border, 2 Naxalites killed in firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.