कुत्रा चावल्यावरुन शेजा-यांमधील वादातून एकाची आत्महत्या

By admin | Published: April 17, 2017 11:39 AM2017-04-17T11:39:10+5:302017-04-17T11:54:37+5:30

कुत्रा चावल्यावरुन दोन शेजा-यांमध्ये झालेल्या वादातून एका 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी अहमदाबाद घडली.

One of the suicides is due to dog brewery | कुत्रा चावल्यावरुन शेजा-यांमधील वादातून एकाची आत्महत्या

कुत्रा चावल्यावरुन शेजा-यांमधील वादातून एकाची आत्महत्या

Next

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. 17 - कुत्रा चावल्यावरुन दोन शेजा-यांमध्ये झालेल्या वादातून एका 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी अहमदाबाद घडली. कुत्र्याच्या मालकाच्या मानसिक त्रासाला कंटाऴून मी आत्महत्या करत आहे असे धवल शहा (32) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले होते. कुत्रा चावण्याची ही घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. 
 
या प्रकरणी घाटलोदीया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुकुल रोडवरील सरजन टॉवरच्या एच ब्लॉकमध्ये राहणारे धवल शहा 1 मार्चला दुपारी 12.30च्या सुमारास इमारतीच्या खाली आले. पत्नीला आणण्यासाठी ते शेजारच्या ब्लॉगमध्ये चालले असताना एम ब्लॉकमध्ये राहणा-या धर्मेंद्र त्रिदिया यांच्या जर्मन शेपर्ड कुत्र्याने शहा यांच्यावर हल्ला केला. 
 
कुत्र्याने शहा यांच्या कमरेचा आणि उजव्याला हाताचा चावा घेतला. त्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वादावादी झाली. धवल यांची पत्नी दिक्षिताने धर्मेंद्र त्रिदिया यांच्यावर धक्काबुक्कीचा आरोप केला. धर्मेंद्र यांनी माझ्या  हाताला पकडून खेचले व धक्काबुकी केली अशी तक्रार दिक्षिताने केली होती. 
 
शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास दिक्षिताने धवलचे वडिल अश्विन शहा यांना फोन करुन धवल दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास दरवाजा तोडून आता प्रवेश केला त्यावेळी धवल यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केलेली होती. त्यांच्या खिशात तीन पानी चिठ्ठी सापडली, त्यात त्रिदियाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. 
 
धवलच्या कुटुंबाने धर्मेंद्र त्रिदिया विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या अध्यक्षांनी मध्यस्थी करुन दोन्ही कुटुंबातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्रिदियाने आपले हेका सोडला नाही असा आरोप अश्विन शहा यांनी केला. त्रिदिया फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
 

Web Title: One of the suicides is due to dog brewery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.