व्हॉटस् अॅपमुळे एक अटकेत
By admin | Published: March 9, 2016 11:49 PM2016-03-09T23:49:33+5:302016-03-09T23:56:16+5:30
अहमदनगर : व्हॉटस् अॅपवर धार्मिक भावना दुखविणारे शब्द वापरून धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : व्हॉटस् अॅपवर धार्मिक भावना दुखविणारे शब्द वापरून धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता निदर्शनास आली. त्यानंतर संदेश पाठविणाऱ्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली.
शेख मोहसीन इस्माईल (रा. तख्ती दरवाजा) हे व्हॉटस् अॅपवरील संजीवनी या ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉटस् अॅपचे संदेश त्यांनी पाहिले असता त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून आलेला संदेश धार्मिक भावना दुखविणारा होता. अमोल राजे सोनवणे (रा. गांधीनगर, एमआयडीसी) यांच्या मोबाईलवरून तो संदेश आला होता. ही बाब निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी तातडीने कारवाई करून एक तासाच्या आत सोनवणे याला अटक केली. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे, असे मालकर यांनी सांगितले. त्याला रात्रीच अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. सोनवणे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)