जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 12:23 PM2017-09-09T12:23:58+5:302017-09-09T12:27:05+5:30
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
श्रीनगर, दि. 9 - उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसराला घेराव घालत तेथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या भ्याड हल्ल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
दरम्यान, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात येत असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
Sopore Encounter #UPDATE: One terrorist killed by security forces. Operation continues #JammuAndKashmir
— ANI (@ANI) September 9, 2017
#Visuals from J&K: Encounter underway between Security forces and terrorists in Baramulla's Sopore (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/7oT2YEGgim
— ANI (@ANI) September 9, 2017
J&K: Security forces launch search ops in Sopore after inputs of presence of terrorists in the area.More details awaited. (visuals deferred) pic.twitter.com/WdrtwMXcR7
— ANI (@ANI) September 9, 2017
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इटूचा एन्काऊंटर
12 ऑगस्ट :दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा केला. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले होते. अकोल्यातील जवान सुमेध गवई आणि तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांना वीरमरण आले.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
4 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले. यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.
दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद
3 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा
1 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.