जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, दुसरा सुरक्षा दलाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:24 PM2021-09-28T15:24:55+5:302021-09-28T15:27:47+5:30
जम्मू-कश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षा दलाने ही कारवाई केली.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला सोमवारी संध्याकाळी लष्कराने पकडले. या दरम्यान, जवानांनी या कारवाईत दुसऱ्या एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. अली बाबर असं पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे.
Uri | One terrorist neutralized, another terrorist caught during an operation in the Uri sector of Jammu and Kashmir: Major General Virendra Vats, GOC, 19 Infantry Division pic.twitter.com/YbJIEKBDdz
— ANI (@ANI) September 28, 2021
भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नापाक कुरापत्या हाणून पाडल्या. उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याकडून एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा झाला, तर दुसऱ्या एकाला पडण्यात यश आलं आहे. 25 सप्टेंबर रोजी उरी सेक्टरमध्ये केलेल्या एका मोठ्या ऑपरेशन दरम्यान सैन्याने ही कारवाई केली आहे.
'दिल्लीत झालेली दंगल पूर्वनियोजित होती'; दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी
या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. यामध्ये 7 AK-क्लास रायफल्स, 9 पिस्तूल, 80 हून अधिक ग्रेनेड आणि भारतीय-पाकिस्तानी चलनाचा समावेश आहे. या कारवाईसंदर्भात मंगळवारी लष्कराकडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. 18 सप्टेंबर रोजी सैन्याच्या गस्ती पथकाला उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी आढळून आले होते. 6 पैकी 4 दहशतवादी सीमेपलीकडे होते, तर 2 दहशतवादी भारतीय सीमेत दाखल झाले होते.