हॉटस्पॉटमधील एक तृतियांश, झाले बाधित अन् उपचाराविना बरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:01 AM2020-06-10T03:01:48+5:302020-06-10T03:04:28+5:30

आयसीएमआर : पुण्या-मुंबईसह दहा शहरांच्या अभ्यासातील निष्कर्ष

One-third of hotspots are infected and cured without treatment! | हॉटस्पॉटमधील एक तृतियांश, झाले बाधित अन् उपचाराविना बरे!

हॉटस्पॉटमधील एक तृतियांश, झाले बाधित अन् उपचाराविना बरे!

Next

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांतील कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील सुमारे एक तृतियांश नागरिकांना ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली आणि उपचाराशिवाय ते आपोआप बरे झाले, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने जाहीर केले आहे. यासंदर्भात आयसीएमआरने देशातील हायरिस्क झोनमधील नागरिकांच्या रक्तामधील सिरमच्या सर्वेक्षणावर आधारित अभ्यास केला. यात मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, कोलकता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या १० शहरांतील कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील नागरिकांचा समावेश होता. या अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष धक्कादायक असले तरी सुखावणारे आहेत.

या अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, देशाच्या कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील १५ ते ३० टक्के नागरिकांना ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली होती. अभ्यासाचा अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेला नाही. तो केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आला आहे,
असे आयसीएमआरच्या वतीने सांगण्यात आले.

मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, इंदूरमध्ये संक्रमण दर जास्त
च्मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदूर या शहरांमध्ये संक्रमणाचा दर जास्त असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. देशातील इतर हॉटस्पॉटपेक्षा या शहरांमध्ये संक्रमणाचा दर १०० पटीने जास्त असल्याचे हा अभ्यास सांगतो.

...असा केला अभ्यास
च्मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या प्रत्येक शहरातील १० कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील ५०० नागरिकांचे नमुने घेण्यात आले. यासोबतच २१ राज्यांतील ६० जिल्ह्यांतील प्रत्येकी ४०० नागरिकांचे नमुनेदेखील घेतले होते. भारतातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे आम्ही नमुने घेतलेल्या भागांतील होते, असे आयसीएमआरने आवर्जून नमूद केले.
च्ईएलआयएसए (एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट अ‍ॅसे) आधारित अ‍ॅन्टीबॉडी चाचणी या सर्वेक्षणात घेण्यात आल्या. अभ्यासासाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी किमान ८ जिल्ह्यांच्या नमुन्यांचा डेटाचे अद्याप विश्लेषण बाकी आहे. ते झाल्यानंतरच संपूर्ण अहवाल प्रकाशित करण्यात येईल, असे आयसीएमआरने सांगितले.

Web Title: One-third of hotspots are infected and cured without treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.