जगातील तीनपैकी एक आत्महत्या भारतातील

By admin | Published: July 8, 2015 01:26 AM2015-07-08T01:26:41+5:302015-07-08T01:26:41+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते.

One in three suicides in the world in India | जगातील तीनपैकी एक आत्महत्या भारतातील

जगातील तीनपैकी एक आत्महत्या भारतातील

Next

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (डब्ल्यूएचओ) जगात कोठे ना कोठे दर ४० सेकंदांला एक आत्महत्या होत असते व प्रत्येक तीनपैकी एक आत्महत्या ही भारतातील असते. विकसित देशांमध्ये विषबाधेमुळे होणारे मृत्यू १-२ टक्के असतात व भारतासारख्या विकसनशील देशांत तेच प्रमाण १५-३० टक्के असते. विदर्भात केवळ कीटकनाशक खाऊन आत्महत्या होतात असे नाही तर उंदीर मारण्याचे (एआयपी आणि झेडआयपी) विष, बेगॉनसारखा (कार्बामेट इनसेक्टिसाईड) फवारा आणि डास मारण्यासाठी (पायरे इनसेक्टिसाईड) वापरण्यात येणारे रसायन पोटात घेऊनही जीव संपविला जातो.
साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागांमध्ये डास मारण्याचे रसायने, फरशी निर्जंतूक करण्याचा द्रव आत्महत्या करण्यासाठी वापरला जातो. नागपूर जिल्ह्यात १२.५३ टक्के लोकांनी हे वरील द्रव वा रसायने घेऊन आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके उत्पादकांनी सुरक्षा आणि त्याच्या वापरासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देणारी शिबिरे घ्यावीत, अशी शिफारस या विषयावर अभ्यास केलेल्या तिघा संशोधकांनी केली आहे. या अभ्यासात नितीन चुटके यांच्यासोबत अश्विन गेडाम व मनोज भांडारकर यांचाही सहभाग होता.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: One in three suicides in the world in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.