एक ट्विट आणि मोदींनी केली महिलेची इच्छा पूर्ण

By Admin | Published: February 27, 2017 06:49 PM2017-02-27T18:49:11+5:302017-02-27T22:09:48+5:30

जनतेमध्ये मिसळण्यासाठी पंतप्रधान मोदी नेहमी कार्यक्रमांमध्ये नागरिकांसोबत सेल्फी घेताना दिसतात. तर कधी प्रोटोकॉल तोडून थेट नागरिकांमध्ये पोहोचलेले असतात. मात्र,यावेळी तर...

One tweet and Modi fulfilled the wishes of a woman | एक ट्विट आणि मोदींनी केली महिलेची इच्छा पूर्ण

एक ट्विट आणि मोदींनी केली महिलेची इच्छा पूर्ण

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - जनतेमध्ये मिसळण्यासाठी पंतप्रधान मोदी नेहमी कार्यक्रमांमध्ये नागरिकांसोबत सेल्फी घेताना दिसतात. तर कधी प्रोटोकॉल तोडून थेट नागरिकांमध्ये पोहोचलेले असतात. यावेळी तर मोदींनी त्यांना ट्विटरद्वारे एक गिप्ट मागणा-या महिलेची इच्छा पूर्ण केली आहे.
 
महाशिवरात्रीच्या दिवशी मोदींनी कोईम्बतूर येथे 112 फूट उंच शंकराच्या मूर्तीचं अनावरण केलं. यावेळी त्यांच्या गळ्यात निळ्या रंगाचा एक स्टोल होता. मोदींनी   ट्विटरवर अनावरणाचा फोटो ट्वीट केला आणि शिल्पी तिवारी नावाच्या एका महिलेला मोदींनी गळ्यात घातलेला स्टोल खूपच आवडला.
 
शिल्पीने थेट मोदींना ट्विट करून मला तुमच्या गळ्यातला स्टोल पाहिजे अशी मागणी केली. हे ट्विट केल्यानंतर कदाचीत शिल्पीला विसरही पडला असेल. पण त्यानंतर जे झालं ते तिच्यासाठी सुखद धक्का होता.

दुस-या दिवशी तो  स्टोल तिच्या घरी पोहोचवण्यात आला. त्यासोबत शिल्पीने केलेल्या ट्विटची प्रिंट आणि त्यावर मोदींची स्वाक्षरी होती. त्यानंतर शिल्पी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Web Title: One tweet and Modi fulfilled the wishes of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.