कौतुकास्पद! एक वर्ष 9 महिन्यांच्या 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड भारी

By सायली शिर्के | Published: October 8, 2020 11:29 AM2020-10-08T11:29:30+5:302020-10-08T11:30:05+5:30

Aadith Vishwanath Gourishetty : अवघं एक वर्ष आणि नऊ महिने वय असलेल्या चिमुकल्याच्या दमदार कामगिरीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.

one year nine month old aadith gourishetty bags international national records | कौतुकास्पद! एक वर्ष 9 महिन्यांच्या 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड भारी

कौतुकास्पद! एक वर्ष 9 महिन्यांच्या 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड भारी

googlenewsNext

नवी दिल्ली - हैदराबादच्या एका चिमुकल्याने कमाल केली आहे. तल्लख बुद्धीमत्तेमुळे त्याची वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (World Book of Record) नोंद करण्यात आली आहे. अवघं एक वर्ष आणि नऊ महिने वय असलेल्या चिमुकल्याच्या दमदार कामगिरीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टी (Aadith Vishwanath Gourishetty) असं मुलाचं नाव असून सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. वर्ड बुक ऑफ रेकॉर्डसोबत आदिथच्या नावे अन्य ही अनेक रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. 

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि अन्य दोन राष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये आदिथच्या नावाची नोंद आहे. आदिथची शार्प मेमरी पाहून अनेक जण भारावून गेले आहे. एवढ्या लहान वयात अनेक गोष्टींचं ज्ञान कसं काय असू शकतं?, सर्व गोष्टी कशा लक्षात राहतात? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. विविध देशाचे झेंडे, कारचे लोगो, अल्फाबेट्स, देवदेवतांची नावे यासाह अनेक गोष्टी आदिथ क्षणात ओळखतो.

आदिथची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

घरातील विविध उपकरणं, रंगांची नाव, प्राणी, पक्षांची नावं, फळं, भाज्या यासह असंख्य गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. शार्प मेमरीसाठी आदिथ लोकप्रिय झाला आहे. अवघड गोष्टींची उत्तर तो अत्यंत सहज देत असल्याने सर्वांनाचं त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आहे. तसेच त्याच्या या गुणांमुळेच वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आदिथच्या आईवडिलांनी देखील मुलाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. 

आदिथच्या हुशारीचा सर्वांनाच अभिमान

लहानपणापासून आदिथला विविध गोष्टींची ओळख करून देतो. त्याच्या ते सर्व उत्तमरित्या लक्षात राहतं. तसेच प्रत्येक मुलामध्ये कलागुण असतात. त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं मत आदिथच्या पालकांनी व्यक्त केलं आहे. एवढ्या कमी वयात या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं हे अत्यंत कठीण असल्याने आदिथच्या हुशारीचा सर्वांनाच अभिमान असल्याचं त्यांच्या पालकांनी म्हटलं आहे. आदिथला विविध गोष्टी शिकण्याची देखील आवड आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: one year nine month old aadith gourishetty bags international national records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.