कांदा निर्यातबंदी मागे; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 05:46 AM2024-02-19T05:46:25+5:302024-02-19T05:46:38+5:30
कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली : कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशात कांदा निर्यातबंदीची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत हाेती. मात्र, त्यापूर्वीच निर्यातबंदी हटविली आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली. या निर्णयामुळे C मिळाला आहे.
महाराष्ट्र, गुजरातमध्ये कांद्याचा मुबलक साठा असून, दर कमी होत असल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिली. त्यानंतर अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील तीन मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला.
किती मेट्रिक टन कांद्याची होणार निर्यात?
समितीने सध्या ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. याशिवाय बांगलादेशलाही ५० हजार टन कांद्याची निर्यात केली जाणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव १०० रुपये प्रतिकिलाेवर पाेहाेचले हाेते. त्यानंतर ८ डिसेंबर राेजी संपूर्ण निर्यातबंदीचा निर्णय घेतला हाेता.