कांदा-बटाटा मार्केट चकाचक कामगारांचा पुढाकार : सुटीच्या दिवशीही केले काम
By admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30
नवी मुंबई : एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये पडलेल्या कुजक्या कांद्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि पसरणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी रविवारी मार्केटची साफसफाई करण्यात आली. मार्केटच्या सफाई कामगारांनी रविवार साधून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
Next
न ी मुंबई : एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये पडलेल्या कुजक्या कांद्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि पसरणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी रविवारी मार्केटची साफसफाई करण्यात आली. मार्केटच्या सफाई कामगारांनी रविवार साधून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. एपीएमसी मार्केट आवारात उघड्यावर पडलेला माल मार्केट आवाराच्या बकालपणाला कारणीभूत ठरत आहे. असे असतानाही अनेक व्यापारी त्यांच्याकडील खराब माल गोणीत भरून गाळ्यालगत ठेवतात. हा माल जास्त काळ तिथेच पडून राहिल्यास त्याची दुर्गंधी संपूर्ण मार्केट परिसरात पसरते. कांदा-बटाटा मार्केटची परिस्थिती अत्यंत बिकट असते. व्यापार्यांकडचा कांदा खराब झाल्यास तो बाजूला काढून गोणीत साठवला जातो. त्यानंतर याच गोण्या गाळ्यालगत रचून ठेवल्या जातात. यामुळे सफाईत अडथळे येतात. कांदे-बटाटे सडल्यामुळे दुर्गंधीही पसरते. अशावेळी त्याचे खापर सफाई कामगारांवर फोडले जाते. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमधील सफाई कामगारांनी रविवारी सुटीच्या दिवशीही स्वेच्छेने सफाई मोहीम राबवली. बाजार समितीच्या या सफाई कामगारांनी एकत्रित येऊन संपूर्ण कांदा - बटाटा मार्केटचा परिसर स्वच्छ केला. गाळ्यालगत साठलेला कुजका कांदा, बटाट्याच्या गोण्या हटवून झाडलोट करण्यात आली. त्यामुळे कांदा - बटाटा मार्केटच्या परिसराला नवी झळाळी मिळाल्याचे पहायला मिळाले.(प्रतिनिधी)फोटो. 02 एपीएमसी कांदा बटाटा मार्केट