कांदा शंभरीपार; केंद्रीय मंत्री म्हणतात, आता तुम्हीच सांगा भाव कसे खाली आणायचे ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 08:11 PM2019-11-06T20:11:41+5:302019-11-06T20:12:25+5:30
अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देशातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव भडकले आहेत.
नवी दिल्ली - अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देशातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव भडकले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव शंभरीपार पोहोचले आहेत. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या भावांनी केंद्र सरकारच्या चिंतेतही वाढ केली आहे. दरम्यान, आयात केलेला कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे दर कमी होतील, तसेच कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडिया किंवा कंझ्युमर अॅपच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे.
कांद्याच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी आज सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पासवान यांनी सांगितले की, ''कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. लवकरच बाजारामध्ये नवा आणि आयात केलेला कांदा दाखल होईल. त्यानंतर कांद्याचे भाव वेगाने कमी होतील.''
दरम्यान, कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याबाबत पासवान यांनी सर्वसामान्यांकडूनही सल्ला मागवला आहे. कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडिया किंवा कंझ्युमर अॅपच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन रामविलास पासवान यांनी केले.
प्याज की जमाखोरी पर कड़ी नजर रखी जा रही है। बहुत जल्द बाजार में नये और आयातित प्याज की आपूर्ति बड़ी तादाद में शुरू हो जाएगी, जिससे कीमतें तेजी से नीचे आएंगी। मीडिया और आमलोग भी, कीमतों को कैसे कम किया जाए, इसपर अपने सुझाव सोशल मीडिया या Consumer App के जरिए हमें दे सकते हैं।4/4 pic.twitter.com/Qkgd6PHBPB
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) November 6, 2019
सध्या देशातील बहुतांश ठिकाणी कांद्याची किंमत १०० रुपयांच्या पलिकडे गेली आहे. ''कांदा उत्पादक राज्ये विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या सरकार आपल्या बफर स्टॉकमधून कांद्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करत आहे, असे पासवान यांनी सांगितले. तसेच बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी इजिप्त, तुर्की, इराण आणि अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.