शिपायासाठीही ऑनलाइन फॉर्म, मग पीजीला का नाही ?- कुलगुरूंचा सवाल
By admin | Published: May 11, 2016 06:56 PM2016-05-11T18:56:44+5:302016-05-11T18:56:44+5:30
अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रतन लाल हंगलू यांनी युनिव्हर्सिटीच्या कामकाजामध्ये राजकारण्यांच्या होणा-या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदवला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रतन लाल हंगलू यांनी युनिव्हर्सिटीच्या कामकाजामध्ये राजकारण्यांच्या होणा-या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदवला आहे. कुलगुरू यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एडमिशनसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या निर्णयाला राजकीय दबावामुळेच बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. यावेळी कुलगुरूंनी राजनैतिक हस्तक्षेपावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हंगलू यांच्या मते मोदी एकीकडे डिजिटल इंडिया करण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र इथं प्रोस्ट ग्रॅज्युएशन करणा-या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा नाही. हल्ली शिपाईच्या पदासाठीही ऑनलाइन फॉर्म भरावा लागत असल्याचंही उदाहरण कुलगुरू हंगलू यांनी दिलं आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या हस्तक्षेपावरही अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रतनलाल हंगलू नाराज असून, कुलगुरूंनी राजीनामा देण्याचीही धमकी दिली आहे. भाजप सरकारनं 4 महिन्यांपूर्वीच त्यांची कुलगुरू पदावर नियुक्ती केली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी युनिव्हर्सिटीची स्वायत्तता संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र स्मृती इराणींनी संसदेत यावर भाष्य करताना हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हल्लीच हंगलू यांनी सर्व प्रवेश परीक्षा ऑनलाइन केल्या होत्या. मात्र स्मृती इराणींनी त्या बदलून पुन्हा ऑफलाइन केल्या आहेत. वाइस चान्सलर हंगलूंनी विद्यार्थी संघटनेचे नेते अवैधरीत्या फॉर्म विकून काळा पैसा कमवत असल्याचाही आरोप केला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ऑनलाइनची सुविधा दिली होती, असं हंगलूंनी सांगितलं आहे. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय युनिव्हर्सिटीमध्ये दखल देत नसून, समाजवादी पार्टीचे नेते कुलगुरू रतनलाल हंगलूंना धमक्या देत असल्याचं वक्तव्य यावेळी स्मृती इराणींचे एसपी महासचिव रामगोपाल यादव यांनी दिली आहे.