ऑनलाईन फसवणूक, 1 रुपया ट्रान्सफर करताच बँक खाते रिकामं
By महेश गलांडे | Published: December 15, 2020 09:48 AM2020-12-15T09:48:21+5:302020-12-15T09:49:07+5:30
फसवणुकीच्या या गुन्ह्यात पहिली घटना सेक्टर 18 येथील रहिवाशी खुर्शीद आलम यांच्यासोबत घडली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे ब्लुटूथ हेडफोन ऑर्डर केले होते.
नवी दिल्ली - दिल्लीतील नोएडा येथी दोघांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यातून 76 हजार रुपये काढण्यात आले आहेत. याप्रकरणी दोघांनीही ठाणे सेक्टर 20 येथे तक्रार दाखल केली आहे. दोघांनीही इंटरनेटवरुन कस्टमर केअरचा नंबर शोधला, पण तो नंबर खोटा निघाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
फसवणुकीच्या या गुन्ह्यात पहिली घटना सेक्टर 18 येथील रहिवाशी खुर्शीद आलम यांच्यासोबत घडली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे ब्लुटूथ हेडफोन ऑर्डर केले होते. मात्र, त्यांना वेळेत डिलिव्हरी न मिळाल्याने त्यांनी इंटरनेटवर कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधला. त्यानंतर, या नंबरवर त्यांनी फोन केला, पण त्यांचा फोन उचलण्यातच आला नाही. थोड्यावेळाने कंपनीच्या कर्मचाऱ्याचा फोन आला, त्याने आपल्या अकाऊंटमधून 1 रुपया ट्रान्सफर करण्याचे सूचवले. त्यानुसार, खुर्शीद यांनी अकाऊंटमधून 1 रुपया ट्रान्सफर केला. मात्र, काही वेळातच त्यांच्या अकाऊंटमधून 50 हजार 698 रुपये काढण्यात आले. त्यानंतर आरोपींनी ग्राहकाचा फोनच घेतला नाही.
एटीएमची माहिती विचारली
दुसऱ्या प्रकरणात सेक्टर 15 मध्ये राहणाऱ्या राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला ई-वॉलेटद्वारे 300 रुपये पाठविले होते. मात्र, ते पैसै संबंधितास पोहचले नसल्याने त्यांनी गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यानुसार, कस्टमर केअरच्या नंबरवर फोन करताच, तेथील कर्मचाऱ्याने एटीएमशी संबंधित माहिती विचारली. त्यानंतर, काहीवेळातच प्रसाद यांच्या अकाऊंटमधून 25 हजार 552 रुपये काढण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.