ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तातडीनं 'या' नंबरवर कॉल करा, वाचेल तुमच्या मेहनतीची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:50 AM2021-04-14T11:50:40+5:302021-04-14T11:51:10+5:30

ऑनलाइन फ्रॉड झाला तर नेमकं काय करायचं याचीच अनेकांना माहिती नसते आणि फ्रॉडला बळी पडलेले अनेक जण साधी तक्रार देखील करत नाहीत. (online frauds complaints in india helpline number by home ministry and cyber police)

online frauds complaints in india helpline number by home ministry and cyber police | ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तातडीनं 'या' नंबरवर कॉल करा, वाचेल तुमच्या मेहनतीची कमाई!

ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तातडीनं 'या' नंबरवर कॉल करा, वाचेल तुमच्या मेहनतीची कमाई!

googlenewsNext

भारतात सध्या ऑनलाइनबँकिंग सेवा वेगानं वाढते आहे. त्याच वेगात किंबहुना त्याहून अधिक वेगानं ऑनलाइन फ्रॉड होण्याचं प्रमाणंही वाढत असल्याचं दिसून येत आहे. ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा उचलून ऑनलाइन लुटारू आपला हेतू साध्य करत असतात. पण ऑनलाइन फ्रॉड झाला तर नेमकं काय करायचं याचीच अनेकांना माहिती नसते आणि फ्रॉडला बळी पडलेले अनेक जण साधी तक्रार देखील करत नाहीत. 

ऑनलाइन फ्रॉडला आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांच्या मेहनतीची कमाई वाचविण्यासाठी गृहमंत्रालय व दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं एकत्रित काम करण्याचं ठरवलं आहे. गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. ज्यावर तुम्ही तातडीनं आपली तक्रार नोंदवू शकता.  (online frauds complaints in india helpline number by home ministry and cyber police)

केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं 155260 ही हेल्पलाइन सुरू केली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलेले असाल तर तातडीनं या क्रमांकावर संपर्क साधा. पुढच्या ७ ते ८ मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यातून ज्या आयडीवरुन पैसे चोरले गेले आहेत. त्या बँकेच्या किंवा ई-साइटला अलर्ट मेसेज हेल्पलाइन क्रमांकावरुन जाईल. त्यामुळे बँक खात्यातून वजा होणारी रक्कम होल्डवर जाईल आणि तुमचे पैसे वाचू शकतात. 

ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांना रोखण्यासाठी गृह मंत्रालयाच्या सायबर पोर्टल https://cybercrime.gov.in/  आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलसोबत 155260 हा पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. पण आता संपूर्णपणे याची तयारी करुन लॉन्च करण्यात आला आहे. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशनचं हे असं व्यासपीठ आहे की दिल्ली हे राज्य याचं सर्वप्रथम यूझर बनले आहे. यासोबतच राजस्थानला देखील जोडण्यात आलं आहे. यानंतर हळूहळू सर्व राज्या या प्रोजेक्टशी जोडले जाणार आहेत. 

जवळपास ५५ बँका, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवे व इतर संस्थांसोबत मिळून इंटरकनेक्ट प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. ज्याचं नाव 'सिटिजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम' असं ठेवण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं कमीत कमी वेळेत फ्रॉडला बळी पडलेल्या लोकांची मदत करता येते. या हेल्पलाइनच्या सहाय्यानं आतापर्यंत २१ लोखांच्या ३ लाख १३ हजार रुपये ऑनलाइन फ्रॉड होण्यापासून वाचविण्यात यश आलं आहे. 

विशेष म्हणजे, हेल्पलाइनच्या एकूण १० वेगवेगळ्या लाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन हेल्पलाइन कधीची व्यस्त राहणार नाही. हेल्पलाइन नंबर 155260 वर कॉल करताच तुम्हाला तुमचं नाव, नंबर आणि घटना घडल्याची वेळ विचारण्यात येते. प्राथमिक माहिती दिल्यानंतर संबंधित पोर्टल आणि बँक, ई-कॉमर्सच्या डॅशबोर्डला घडलेल्या घटनेची तातडीनं माहिती पोहोचविण्यात येते. यासोबतच फ्रॉडला बळी पडलेल्या व्यक्तीच्या संबंधित बँकेसोबतही घटनेची माहिती दिली जाते. ऑनलाइन फ्रॉड झाल्यापासूनचे पुढचे २ ते ३ तास अतिशय महत्वाचे ठरतात. फ्रॉड झाल्या क्षणाला तुम्हाला तातडीनं तक्रार करणं गरजेचं ठरतं. तुम्ही https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावरही तक्रार दाखल करू शकता. 
 

Web Title: online frauds complaints in india helpline number by home ministry and cyber police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.