आजपासून ऑनलाईन नोंदणीनंतरच वाहन चालविण्याचा परवाना -------------

By Admin | Published: August 31, 2014 10:51 PM2014-08-31T22:51:50+5:302014-08-31T22:51:50+5:30

Online license for driving after online registration today ------------- | आजपासून ऑनलाईन नोंदणीनंतरच वाहन चालविण्याचा परवाना -------------

आजपासून ऑनलाईन नोंदणीनंतरच वाहन चालविण्याचा परवाना -------------

googlenewsNext
शिक : लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या मतदारांची नावे शोधण्यासाठी शिवसेनेने लीडर, तर मनसेने कंडक्टर मशीनचा वापर केला. तथापि, सेनेने कितीही दावा केला तरी मनसेचे कंडक्टर नावे शोधण्यासाठी अधिक उपयुक्त ठरले.
निवडणुकीपूर्वीच मतदारांना मतदान केंद्र आणि अनुक्रमांकाची माहिती देणार्‍या चिठ्ठीसाठी शिवसेनेने लीडर या मोबाईल सॉफ्टवेअरचा वापर केला. त्यात बूथनिहाय मतदार याद्या लोड करून देण्यात आल्या होत्या. मतदाराचे नाव सर्च केल्यास माहिती मिळत होती. इतकेच नव्हे तर मतदाराने मोबाईल नंबर सांगितला तर त्यावर मतदान केंद्र आणि मतदार अनुक्रमांक पाठविण्याची सोय करण्यात आली होती. मनसेने बस वाहक वापरतात तसे इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीन वापरले. कार्यकर्ते त्याला कंडक्टर मशीन म्हणूनच संबोधतात. मतदाराला स्लिप देण्यासाठी मनसेने याच यंत्राचा वापर केला होता. तसेच आजही मतदान केंद्रावर त्याचाच वापर झाला. उदोजी मराठा आणि अन्य अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते हे यंत्र घेऊन बसले होते. त्यामुळे त्यांना मतदारांची नावे शोधून देणे शक्य झाले. सेनेच्या लीडरच्या तुलनेत त्याचा कमी वापर झाला. या मोबाइल सॉफ्टवेअरवरून बूथ प्रतिनिधी किती मतदान झाले, मतदान सकारात्मक होते की नकारात्मक अथवा मतदानाचा कौल कळणे कठीण आहे म्हणजेच सस्पेक्टेड असे ऑप्शन होते. ही सर्व माहिती सेनेच्या नियंत्रण कक्षाला मिळणार होती आणि दुसरीकडे अनुकूल मतदान कमी असेल तर सोयीचे मतदार बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली.

Web Title: Online license for driving after online registration today -------------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.