एका लग्नाची गोष्ट! फ्लॅटमध्ये सात फेरे; भटजींचे ऑनलाईन मंत्रोच्चार; नातेवाईकांकडून डिजिटल आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:30 PM2021-05-06T13:30:56+5:302021-05-06T13:31:19+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं विवाह सोहळा ऑनलाईन संपन्न; कुटुंबीय गुगल मीटद्वारे हजर

online marriage of mandi pratibha thakur and up mohit chauhan due to corona crisis | एका लग्नाची गोष्ट! फ्लॅटमध्ये सात फेरे; भटजींचे ऑनलाईन मंत्रोच्चार; नातेवाईकांकडून डिजिटल आशीर्वाद

एका लग्नाची गोष्ट! फ्लॅटमध्ये सात फेरे; भटजींचे ऑनलाईन मंत्रोच्चार; नातेवाईकांकडून डिजिटल आशीर्वाद

Next

नोएडा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आयुष्य जगण्याची पद्धतच कोरोना संकटामुळे बदलून गेली आहे. कोरोना संकटापूर्वी लग्न सोहळ्यात मोठी गर्दी पाहायला मिळायची. मात्र आता अगदी मोजक्या नातेवाईकांच्या, निकटवर्तीयांच्या उपस्थितीत लग्न सोहळे संपन्न होत आहेत. काही ठिकाणी तर स्मार्ट लग्न समारंभ होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या एका डिजिटल विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

ग्रेटर नोएडा १४ ऍव्हेन्यूमध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहणारा मोहित चौहान आणि हिमाचल प्रदेशच्या मंडीची रहिवासी असलेली प्रतिभा ठाकूर शनिवारी विवाह बंधनात अडकले. मोहित आणि प्रतिभा दोघेही सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. या दोघांनी ऑनलाईन लग्न केलं. या लग्नाला दोन्हीकडून एकही नातेवाईक प्रत्यक्ष उपस्थित नव्हता.

चिंताजनक! कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सापडले; देशाचे टेन्शन वाढले

मोहित-प्रतिभा यांचे आई-वडील, नातेवाईक यांनी लग्नाचे विधी ऑनलाईन पाहिले. गुगल मीटच्या माध्यमातून ते या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी नवदाम्पत्याला डिजिटल आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे गुरुजीदेखील या सोहळ्याला ऑनलाईन हजर होते. मोहित आणि प्रतिभा ५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ३० एप्रिलला त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी ५० नातेवाईकांची वरात हिमाचलला जाणार होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं १० जणांना नेणंदेखील योग्य वाटलं नाही. त्यामुळे दोघांनी कुटुंबियांसोबत बोलून ऑनलाईन विवाह करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: online marriage of mandi pratibha thakur and up mohit chauhan due to corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.