ऑनलाइन नामांकन, ग्लव्हज घालून मतदान; बिहारमध्ये यावर्षी अशी होणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 06:23 PM2020-08-21T18:23:01+5:302020-08-21T18:27:30+5:30
बिहारमध्ये या वर्षअखेरीच विधानसभा निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच बिहार विधानसभेची मुदतही संपत आली आहे. त्यामुळे राज्यात या वर्षअखेरीच विधानसभा निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार बिहार विधानलभा निवडणुकीसाठी ऑनलाइन नामांकन दाखल केले जाणार आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक नियमांचेही पालन करावे लागणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून स्पष्ट केले की, यावेळी उमेदवार सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करू शकतील. देशातील निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच कुठलाही उमेदवार हा सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करतील. त्याशिवाय, विधानसभेच्या उमेदवारांचे नामांकनही ऑनलाइन भरता येईल.
दरम्यान, निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीसाठी होणाऱ्या घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी असेल. तसेच केंद्रीय गृहमंत्रालाने दिलेल्या सूचनांनुसारच सभा आणि रोड शोंना परवानगी देण्यात येईल.
तसेच निडणुकीदरम्यान, कोरोना संकट विचारात घेऊन सावधगिरी बाळगण्याची सूचना निवडणुक आयोगाने केली आहे. निवडणूक काळात फेस मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ग्लव्हज, पीपीई किट्सचा वापर निवडणूक प्रक्रियेदरम्यान केला जाईल. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालक करण्यात येईल
.
कोरोना विषाणूच्या फैलावाची भीती विचारात घेऊन व्होटर रजिस्टर असाइन करण्यासाठी सर्व मतदारांना ग्लव्स देण्यात येतील. मतदारांना ईव्हीएम मशीनमध्ये मतदान करण्यापूर्वी गरज पडल्यावर ओळख पटवण्यासाठी फेसमास्क हटवावा लागेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी