आॅनलाईन बघता येईल तक्रारीची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:00 AM2018-01-27T04:00:33+5:302018-01-27T04:00:36+5:30

ई-आॅफिस योजनेंतर्गत सामान्य नागरिकांच्या तक्रारींची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासन एक आॅनलाईन यंत्रणा तयार करणार आहे

The online status of the complaint can be seen online | आॅनलाईन बघता येईल तक्रारीची स्थिती

आॅनलाईन बघता येईल तक्रारीची स्थिती

Next

संतोष ठाकूर
नवी दिल्ली : ई-आॅफिस योजनेंतर्गत सामान्य नागरिकांच्या तक्रारींची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासन एक आॅनलाईन यंत्रणा तयार करणार आहे. सीआय—टू नामक ही यंत्रणा असून, त्याद्वारे आपल्या तक्रारीची शासन दरबारी असलेली स्थिती सामान्य नागरिक आॅनलाईन बघू शकेल.
येत्या सहा महिन्यात यावर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने हे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. या तंत्राच्या माध्यमातून नागरिक शासनाच्या निर्णयात सहभागी होऊ शकतील.
हा एक मोठा बदल असून अधिकारी जनतेच्या कोणत्याही तक्रारीकडे कानाडोळा करू शकणार नाही; शिवाय तक्रारकर्त्याला शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. एका अधिकाºयाच्या मते, ही यंत्रणा म्हणजे एक आॅनलाईन पोर्टल असणार आहे.
ही सुविधा इतर संघटनांनादेखील देण्यात येईल. ही योजना शासनाने निश्चित केलेल्या मिशन मोड प्रोजेक्ट ई- आॅफिसच्या ११ कार्यक्रमांपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर मंथन सुरू होते.

Web Title: The online status of the complaint can be seen online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.